प्रतिनिधी : मंचर
नगरविकास विभागाने मंचर नगरपंचायतीची रितसर रचना होईपर्यंत नगरपंचायतीचे अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी जुन्नर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिद्र घोलप यांची प्रशासक म्हणून सोमवारी (दि. २९) नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक २५ रोजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मंचर नगरपंचायतसंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली होती.मंचर नगरपंचायतीसंदर्भात २३ डिसेंबर २०२० रोजी हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्या कालावधीत एकही हरकत जिल्हाधिकारी पुणे यांना प्राप्त न झाल्याने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी मंचर नगरपंचायत गठित करण्यात आली आहे. नगरपंचायत निवडणूक जिल्हा परिषद निवडणुकीबरोबर अथवा जुलैमध्ये लागू शकते. तोपर्यंत मंचर नगरपंचायतीचा कारभार जुन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी पाहणार आहेत, मंचर नगरपंचायतीत साधारणतः सतरा सदस्य असण्याची शक्यता आहे.अशी असेल मंचर नगरपंचायतीची हद्द.
अनुसूची 'अ'
संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले स्थानिक क्षेत्र. मंचर सर्व्हे नं. १ ते १७३, सर्व्हे नं. १७७, गावठाण खुद्द १७४ ते १८१, मोरडेवाडी सर्व्हे नं. १ ते ८१, गावठाण सिटी सर्व्हे नं. १ ते ९९८
अनुसूची 'ब'
संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील उत्तर एकलहरे शिव, उत्तर पूर्व - घोडनदी, चांडोली बुद्रुक, पूर्व - चांडोली खुर्द, दक्षिण पूर्व अवसरी खुर्द शिव, दक्षिण - शेवाळवाडी, दक्षिण पश्चिम निघोटवाडी शिव, पश्चिम निघोटवाडी शिव पश्चिम उत्तर सुलतानपूर शिव.