इंदापूर प्रतिनिधी:
इंदापूर
तालुका भाजपाच्या वतीने दि.२७ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या शेतीचे वीजजोड तातडीने
जोडावी यासाठी धरणे आंदोलन कडाक्याच्या थंडीत सुरू आहे. रात्री भाजपा नेते
हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व इतर प्रमुख नेत्यांनी
शेतकऱ्यांबरोबर भाकरी, पिठलं व ठेचाखात तेथेच झोप काढत
आंदोलनाची व्याप्ती वाढविली. त्यानंतर महावितरण कार्यालय प्रांगणात त्यांनी सर्व
शेतकऱ्यांसमवेत ठिय्या आंदोलन सुरू केले.
इंदापूर
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा गेली ११ दिवसापासून महावितरणने पुर्णपणे
खंडित केला आहे. त्यामुळे भाजपा नेते व मंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी
इंदापूर येथील महावितरण कार्यालयासमोर सकाळ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले
शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत चालू होई पर्यंत आमचे बेमुदत धरणे आंदोलन चालूच
राहील, असे हर्षवर्धन पाटील
यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी आहे. राज्य
साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व सहकाऱ्यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी
पाटील व जगदाळे यांची भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला.
दरम्यान, तहसिलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक टी.वय. मुजावर यांच्या उपस्थितीत दि.२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हर्षवर्धन पाटील,आप्पासाहेब जगदाळे व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक अयशस्वी ठरली. यावेळी पाच हफ्ते भरल्याशिवाय वीज सुरू केली जाणार नाही असा पवित्रा वीज वितरण अधिकाऱ्यांनी घेतला तरराज्याचे वीज मंत्री यांच्या तालुक्यास व इंदापूर तालुक्यास वेगळे धोरण का या पाटील यांच्या म्हणण्यावर वीज वितरण कंपनीचे अधिकारी निरुत्तर झाले. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.