Skip to main content

Posts

Showing posts from November, 2021

जि.प.सदस्य गुलाब पारखे यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचे भूमिपूजन

प्रतिनिधि : रामकृष्ण भागवत निमगांव निमगाव तर्फे म्हाळुंगे ता.जुन्नर येथे  जिल्हा परिषद सदस्य गुलाब  पारखे यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्हा परिषदेमार्फत ६५ लक्ष रु. निधीच्या विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी सावरगाव धालेवाडी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे ,युवासेना तालुका प्रमुख विकिभाऊ पारखे , निमगाव चे सरपंच मोहिनीताई घुले ,धामनखेल सरपंच संतोष जाधव ,बस्ती गावचे सरपंच प्रकाशशेठ गिधे ,उपतालुका प्रमुख राजुशेठ चव्हाण ,उपविभागप्रमुख आशिषशेठ हिंगे ,धामनखेल गावचे उपसरपंच अभिभाऊ वर्पे मा, उपसरपंच आर. डी. गोरडे ,माऊली काचळे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पारखे , बस्ती गावचे तंटामुक्ती अध्यक्ष जाधव दादा ,निमदारी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आनंदभाऊ भगत , ग्रामसेवक बनसोडे साहेब , ग्रामपंचायत सदस्य दीपालीताई पारखे , शरदभाऊ वाघुले,गणपत नाना घुले,अविनाशभाऊ केदार , मा सरपंच भगवान वाघुले ,गोरडे सर  गुलाब गोरडे, नवनाथ जाधव ,मयुरे घुले ,शाखा प्रमुख रोहित घुले ,गव्हर्नमेंट काँट्रॅक्टर प्रतिक घुले , निमगाव आणि धामनखेल ग्रामस्थ उपस्थित होते.

आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघातील जलसिंचन प्रकल्पांचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत - जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सूचना

समर्थ भारत न्यूज पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघातील जलसिंचन प्रकल्पांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक झाली. प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री श्री पाटील यांनी यावेळी दिले.  जलसंपदा विभागाच्या आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील  यांनी आंबेगाव तालुक्यातील लोणी आणि धामणी परिसरास पाणी देण्यासाठी नियोजित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजना राबविण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश दिले. तसेच आदिवासी भागातील कळमजाई उपसा सिंचन योजनेचे सर्व्हेक्षण तातडीने पूर्ण करुन घ्यावे असे ही सांगितले.सर्व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जलसंपदा विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. त्याअनुषंगाने पुण्यात पुन्हा एकदा व्यापक बैठक आयोजित करण्यात यावी. त्यास संबंधित लोकप्रतिनिधी यांना बोलवण्यात यावे, अशा सूचना श्री. पाटील यांनी दिल्या.  यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी, शि...

मुलींच्या वस्तीगृहासाठी ९ कोटी ७० लाख रुपयांचा निधी - आ. निलेश लंके

  पारनेर - प्रतिनिधी: पारनेर तालुक्यातील पळशी येथील आदिवासी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेतील मुलींच्या वस्तीगृहाच्या कामासाठी ९ कोटी ७० लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी दिली आहे. आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांना या निधीबाबत २६ ऑक्टोबर २०२० रोजी लेखी पत्र देऊन या निधीची मागणी केली होती. त्यानुसार पळशी येथील शासकीय आश्रमशाळा, पळशी येथील पायाभुत सुविधा अंतर्गत या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. या शासकीय आश्रमशाळेत आदिवासी ठाकर भील्ल बंजारा धनगर या समाजातील मुला मुलींचे शिक्षण घेण्याचे मोठे प्रमाण आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा ही योजना राबविली जाते. माझ्या पारनेर-नगर मतदार संघातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पळशी ता. पारनेर, जि. अहमदनगर या शाळेत १ ली ते १० वी पर्यंतचे वर्ग असुन एकूण मंजुर विद्यार्थी क्षमता ५०० (४०० निवासी आणि १०० वाहिस्थ ) एवढी आहे. या शाळेच्या आस्थापनेवर वर्ग-३ सावर्गाची १५ आणि वर्ग ...

एक महिन्याच्या व्याजाचे पैसे न दिल्याने पुलावर बोलावून केला खून

धनकवडी प्रतिनिधी: व्याजाने घेतलेल्या पैशाचे व्याज दिले नाही याचा राग धरून धारदार हत्याराच्या साह्याने वार करून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. ही घटना कात्रज नवले ब्रीज दरम्यान सेवा रस्त्यावर रविवारी रात्री ११.३० वाजता घडली. शरद शिवाजी आवारे ,( वय ४३ वर्षे , रा. संभाजीनगर , धनकवडी ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रशांत महादेव कदम , ( वय ३१वर्षे रा. धनकवडी) यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन प्रकाश शिंदे सह एका अनोळखी व्यक्ती विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शरद आवारे याने प्रकाश शिंदे याच्या कडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याचे व्याज दरमहा देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे शरद आवारे दरमहा व्याज देत होता. मात्र नोव्हेंबर महिन्याचे व्याज त्याने दिले नाही. म्हणून प्रकाश शिंदे याने शरद ला कात्रज नवले ब्रीज दरम्यान सेवा रस्त्यावरील चंद्रसखा वेअर हाऊस जवळ बोलावले होते. यावेळी दोघांमध्ये वादविवाद झाला आणि चिडलेल्या प्रकाश शिंदे आणि त्याच्या साथीदाराने धारदार हत्याराने शरद वर वार करून पळून गेले. जख...

हातावरील टॅटूवरून शोधला अल्पवयीन मुलीच्या बाळाचा बाप

बारामती : प्रतिनिधी  अल्पवयीन मुलीला फुस लावत तिच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवल्याप्रकरणी शहर पोलिसांनी युवकावर बलात्कार आणि पॉस्को कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल त्याला अटक केली आहे. या आरोपी युवकाला पोलिसांनी नाव माहित नसताना त्याच्या हाताच्या ‘टॅटू’वरुन शोध घेत अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आईसमवेत ससून रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी गेली होती. मुलगी बारामतीची असल्याने शहर पोलीसांनी याबाबत तेथील पोलीसांनी माहिती दिली. त्यानंतर तातडीने पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह त्या ठिकाणी पोहचत पीडित मुलीचा व तिच्या आईचा जबाब नोंदवला. मोरगाव रस्त्याकडे एका शाळेत जात असताना तिची एका मुलाबरोबर ओळख झाली. दोन-तीन वेळा तो तिला रस्त्यातच भेटला. त्याने तिला फूस लावले. त्यातून त्यांचे निरा डावा कालव्यालगत काहीवेळा शारीरिक संबंध आले. त्यातून ती गरोदर राहिली. समाजात व बारामतीत चर्चा होईल म्हणून आईने मुलीला ‘ससून’मध्ये नेले. पोलिसांनी मुलीकडे आरोपीबद्दल चौकशी केली. मात्र, त्याच्या हातावर बदाम व हातावर स...

मंचर नगरपंचायतीची निवडणूक होईपर्यंत प्रशासकपदी मच्छिंद्र घोलप यांची नियुक्ती

प्रतिनिधी : मंचर  नगरविकास विभागाने मंचर नगरपंचायतीची रितसर रचना होईपर्यंत नगरपंचायतीचे अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी जुन्नर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिद्र घोलप यांची प्रशासक म्हणून सोमवारी (दि. २९) नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक २५ रोजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मंचर नगरपंचायतसंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली होती. मंचर नगरपंचायतीसंदर्भात २३ डिसेंबर २०२० रोजी हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्या कालावधीत एकही हरकत जिल्हाधिकारी पुणे यांना प्राप्त न झाल्याने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी मंचर नगरपंचायत गठित करण्यात आली आहे. नगरपंचायत निवडणूक जिल्हा परिषद निवडणुकीबरोबर अथवा जुलैमध्ये लागू शकते. तोपर्यंत मंचर नगरपंचायतीचा कारभार जुन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी पाहणार आहेत, मंचर नगरपंचायतीत साधारणतः सतरा सदस्य असण्याची शक्यता आहे.अशी असेल मंचर नगरपंचायतीची हद्द.  अनुसूची 'अ' संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले स्थानि...

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महेश लांडगेंची शिरूरमध्ये मोर्चेबांधणी सुरू

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी: शिरुर लोकसभा मतदारसंघात शिरूर-हवेली , खेड , जुन्नर , आंबेगावसह हडपसर व भोसरी विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. यात भोसरी विधानसभा सोडली तर पाचही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार तर भोसरीमध्ये भाजपचे महेशदादा लांडगे विजयी झाले होते. शिरूर लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे प्रतिनिधित्व करीत आहेत. २०२४ मध्ये होणा-या लोकसभेसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच भाजप पक्षानेही यात आघाडी घेतली आहे. २७ नोव्हेंबर रोजी आमदार महेशदादा लांडगे यांचा वाढदिवस होता. लांडगे हे भोसरी विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत असतानासुद्धा त्यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात फ्लेक्सची बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरमध्ये दिल्ली येथील संसद भवनचे बॅकग्राउंड व आपला महेशदादा मावळा शिवनेरीचा , भावी खासदार शिरूरचा अशा आशयाचे हे फ्लेक्स सगळीकडे लक्ष वेधून घेत आहे. त्यातच येणा-या काळात साखर कारखाने , जिल्हा परिषद , पंचायत समिती , मार्केट कमिटी या निवडणुकीत भाजपने तरुणांच्या मनातील आमदार महेशदादा यांच्या रूपाने ताकद मिळणार असल्याचे या फ्लेक्सच...

मंत्रीमंडळाच्या निर्णयाची होईना अंमलबजावणी, आधिकाऱ्यांवर अजितदादा वैतागले

पुणे प्रतिनिधी: कोरोना काळात सरळ सेवा भरती व सयुंक्त पूर्व परीक्षांसाठी वयोमर्यादेतील वाढ तसेच ४१६ उमेदवारांच्या अंतीम नियुक्त्यांच्या विषयावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांना फैलावर घेतले. वयोमर्यादेच्या सवलतीपासून कुणीही वंचित राहणार नाही याची काळजी घ्या, असे पवार यांनी बजावले आहे. कोरोना काळात सरळ सेवा भरती व सयुंक्त पूर्व परीक्षा न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपली होती. त्या पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एका वर्षाच्या सवलतीचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला होता. त्याचबरोबर ४१६ उमेदवारांची निवड होऊनही नियुक्ती राखडल्याने या उमेदवारांना नियुक्ती द्यावी. मंत्रिमंडळाच्या या दोन निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार व सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले. कॅबिनेटच्या बैठकीदरम्यान विभागाच्या प्रधान सचिव सचिव सुजाता सौनिक यांना या संदर्भात विचारणा करण्यात आली. त्याव...

मेलेल्या उंदराला पाहण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू

नागपूर प्रतिनिधी: मेलेल्या उंदराला कुतूहलाने बघण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा तलावात तोल गेला. आवतीभोवती कुणीही नव्हते. कुणाच्याही ध्यानात ही बाब आली नाही. यातच तलावात बुडून चिमुकल्याचा हकनाक बळी गेला. शनिवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास उमरेड येथील हिरवा तलावात ही घटना घडली. सानिध्य दिनेश बावनकुळे असे या चारवर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. मंगळवारी पेठ येथील निवासी दिनेश बावनकुळे हे मोलमजुरीची कामे करतात. नेहमीप्रमाणे दिनेश सकाळीच बाहेर गेले. दरम्यान सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका इसमाने घरातील मेलेला उंदीर पकडून तो हिरवा तलावाकडे नेला. त्या माणसाच्या अगदी मागोमाग सानिध्यसुद्धा गेला. त्या इसमाने उंदीर तलावाच्या काठावर फेकून दिला आणि तो घराकडे परतला. दुसरीकडे सानिध्य तलावाशेजारीच खेळत बसला. अशात तोल गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. उमरेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून , पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर करीत आहेत. शोधाशोध व सोशल मीडिया सकाळी ९ वाजतापासून गेलेला सानिध्य परत आला नाही. या कारणाने त्याच्या आईने आवतीभोवती विचारणा केली. सानिध्यची शोधाशोध सुरू झाली....

व्यवसायाच्या आमिषाने महिलेची ३० लाखांची फसवणूक

  पिंपरी : प्रतिनिधी  व्यवसायातून पैसे कमावण्याचे आमिष दाखवून एका महिलेची २९ लाख ८० हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. स्पाईन रोड, चिखली येथे जुलै ते २३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. मनीषा भगवान घाडगे (वय ३७, रा. स्पाईन रोड, चिखली) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अश्विनी ललित चौधरी (रा. चिंचवड), ललित विश्वनाथ चौधरी, निकिता समाधान पाटील, समाधान भागवत पाटील (रा. बिजली नगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला व्यवसाय करण्याचे आमिष दाखवले. होलसेल दरामध्ये वाडा, कोलम तांदूळ, उडीद पापड, तूर डाळ, ढोकळा पीठ, काळे उडीद डाळ, पांढरी उडीद डाळ खरेदी करायची आणि ती चढ्या दराने डी मार्टला विकायची. त्यातून पैसे कमावू, असे आरोपींनी फिर्यादीला आमिष दाखवले. आरोपींनी डी मार्टच्या पर्चेसिंग ऑर्डर फिर्यादीला दाखवल्या. व्यवसायासाठी फिर्यादीकडून पैसे घेतले. फिर्यादीची २९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

भिडेवाड्यात पुन्हा मुलींची शाळा निर्माण करणार - छगन भुजबळ

पुणे : प्रतिनिधी  भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून या ठिकाणी मुलींची शाळा निर्माण केली जाईल, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित १३१ वी महात्मा फुले पुण्यतिथी व समता दिनाचे औचित्य साधून रविवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना समता पुरस्काराने गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी छगन भुजबळ होते. व्यासपीठावर मध्य प्रदेशचे आमदार सिद्धार्थ कुशवाह, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार पंकज भुजबळ, दीप्ती चौधरी, कमल ढोले पाटील, महाज्योतीचे संचालक दिवाकर गमे, प्रा. हरी नरके, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.भुजबळ म्हणाले, भिडेवाड्याचा विकास करून या ठिकाणी मुलींची शाळा निर्माण केली जाईल. फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक भूमी संपादन प्रक्रिया पूर्ण करून कामास तात्काळ प्रारंभ करण्यात येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येईल.  सावित्रीब...

पुणे जिल्ह्यातील गावातला कोरोना होतोय हद्दपार; हॉटस्पॉट गावांची संख्याही घटली

पुणे प्रतिनिधी : जगात एकीकडे ओमिक्रॉन नामक कोरोनाचा नव्या विषाणू धुमाकूळ घालत आहे. या भीतीमुळे पुन्हा लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी एकेकाळी जिल्ह्यात धुमाकूळ घातलेला विषाणू आता हळूहळू हद्दपार होत आहे. या आठवड्यात हॉटस्पॉट गावांची संख्या पुन्हा घटली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ८ गावांत १० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. हे चित्र दिलासादायक असले तरी विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे आता पुन्हा सतर्क राहावे लागणार आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाने उच्चांक गाठला होता. दुसऱ्या लाटेत मे महिन्यापासून मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढली गेली. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने दवाखान्यात खाटासुद्धा मिळणे कठीण झाले होते. त्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याने चिंतेत आणखी भर पडली होती. मात्र , जिल्हा प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने यानंतर प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर प्राधान्याने भर दिल्याने कोरोना बाधित आटोक्यात आले. जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगाने राबविल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले. असे असले तरी ग्रामीण भागात १०पेक्षा जास्त रुग्ण असणाऱ्या हॉट...

संजय राऊतांकडूनPM'च्या लग्नाचं आमंत्रण, लेकीच्या लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा!

मुंबई: प्रतिनिधी  विरोधकांना सातत्यानं अंगावर घेणारे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी लग्न होणार आहे. हा विवाह सोहळा उद्या म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी  पार पडणार आहे.  दरम्यान, मुलीच्या लग्नाच्या निमित्तानं आयोजित संगीत कार्यक्रमात आज संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला. या दोघांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्या डान्स चर्चेत आला. यातच आता या लग्नाची आमंत्रण पत्रिका जोरदार चर्चेत आली आहे. कारण, ही पत्रिका 'पीएम'च्या लग्नाचे आमंत्रण देत आहे. उद्याच्या लग्न समारंभाआधी संगीत कार्यक्रम, हळदी समारंभ असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पूर्वशी राऊत आणि मल्हार नार्वेकर या लग्न समारंभाला अनेक बड्या व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी छापण्यात आलेली ही लग्नपत्रिकाच सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या पत्रिकेच्या मुखपृष्ठावरील (पीएम की शादी) असा हॅशटॅग टाकण...

अमृता फडणवीस 'कधीच' राजकारणात येणार नाहीत; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : प्रतिनिधी  माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या बऱ्याच चर्चेत असतात. अमृता फडणवीस सोशल मीडियात सक्रीय असतात. वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यावर अमृता या रोखठोक भाष्य करत असतात. अमृता फडणवीसांनी शिवसेनेसोबत ट्विटरवरुन घेतलेला पंगा चांगलाच चर्चेत आला होता. अमृता फडणवीस या सातत्याने राजकीय विषयावर भाष्य करत असतात त्यामुळे त्या भविष्यात राजकारणात प्रवेश करतील का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. परंतु आता खुद्द त्यांचे पती देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिले आहे. अलीकडेच अमृता फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यात ट्विटरवॉर सुरु झालं होतं. या घडामोडीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या वैयक्तिक स्तरावर राजकारण सुरु आहे. राजकारणात सगळ्या गोष्टींना माणसाने तयार असायला हवं. पण यात अनेकांचे चेहरे उघड झाले. अमृता फडणवीस हे वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा स्वत:चा छंद, आवडी आहेत. पण जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट केले जाते. राजकारणात मी पातळी सोडली नाही आणि कधीच सोडणार नाही. अमृता फडणवीस कधीच राजकारणात येणार नाही हे मी बोललेला ज...

महाराष्ट्र सुधारण्यासाठी बालविवाह रोखणे गरजेचे- रुपाली चाकणकर

तळेगाव ढमढेरे : प्रतिनिधी महाराष्ट्र सुधारण्यासाठी बालविवाह रोखणे काळाची गरज असून, त्यासाठी लोकप्रतिनिधीसह समाजाचीही जबाबदारी आहे. महिलांवरील अन्याय व अत्याचार याविरुद्ध आमचा लढा असून, महिलांना आत्मसन्मान मिळवून देणे ही महिला आयोगाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले. तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे आयोजित केलेल्या नागरी सत्कार समारंभात चाकणकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिरूर- हवेलीचे आमदार ऍड.अशोक पवार होते. रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल येथील श्रीसंत सावता महाराज मंगल कार्यालयात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामस्थांतर्फे नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी चाकणकर पुढे म्हणाल्या की, राज्य महिला आयोगामार्फत आदिवासी महिलांसह सर्व स्तरातील महिलांना न्याय दिला जाईल. महिलांवरील अन्यायाविरुद्ध आमचा लढा राहील. महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. बालविवाह रोखणे ही सामाजिक जबाबदारी आहे. वंशाच्या दिव्यासाठी मुलींची हत्त्या करू नका. आमचा लढा समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा व प्...

पिंपरी-चिंचवड: चोरट्यांनी टेम्पोसह पळविल्या तब्बल सात दुचाकी

पिंपरी प्रतिनिधी: वाहन चोरट्यांच्या टोळ्यांचा पर्दाफाश केल्यानंतरही पिंपरी-चिंचवड शहरातून वाहन चोरीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे वाहनधारक धास्तावले आहेत. शहरातून सात दुचाकी तसेच एक टेम्पो चोरीला गेला. या वाहनचोरी प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये रविवारी (दि. २८) गुन्हे दाखल करण्यात आले. श्रीराम मारुती भोसले (वय ५५, रा. संतनगर, मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने त्यांचा दोन लाख रुपये किमतीचा पिकअप टेम्पो त्यांच्या राहत्या घराच्या सोसायटीसमोर रस्त्यावर पार्क केला होता. अज्ञात चोरट्याने ते वाहन चोरून नेले. वाहन चोरीचा हा प्रकार शनिवारी (दि. २७) रात्री पावणेबारा ते रविवारी (दि. २८) सकाळी सात या कालावधीत घडला. चाकण, निगडी, भोसरी, पिंपरी, दिघी, तळेगाव दाभाडे आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक अशा एकूण सात दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

राजगडावर चढाई करताना वाटेत चक्कर येऊन ६० वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू

मार्गासनी प्रतिनिधी: किल्ले राजगडावर जात असताना एका वयोवृद्ध व्यक्तीचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाले असल्याची घटना राजगड गडावर घडली. पांडुरंग पंडित (रा. पाषाण) पुणे यांनी केली पोलिसांत तक्रार दिली. दिलीप महामुनी (वय 60 वर्षाच्या पुढे अंदाजे, रा. पाषाण पुणे) असे या व्यक्तीचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्तावीस नोव्हेंबरला पाषाण येथील पाच जणांचा ग्रुप किल्ले राजगड पाहण्यासाठी या गावी मुक्कामी आला होता. 28 नोव्हेंबरला सकाळी पाच वाजता हा ग्रुप किल्ले राजगड पाहण्यासाठी जात असताना वाटेत महामुनी हे लघुशंकेसाठी गेले. ते लवकर परत न आल्याने त्यांचे मित्र पाहण्यासाठी गेले. त्याठिकाणी महामुनी खाली पडल्याचे दिसून आले. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर त्यांची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्यामुळे त्यांना तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे जाहीर केले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

सव्वासातशे वर्षानंतरही माऊलींचे विचार समाजासाठी प्रेरक

आळंदी प्रतिनिधी: महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. सव्वासातशे वर्षांनंतर माऊलींच्या विचारांची शिकवण वाढत असून त्यांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले आहे. तीर्थक्षेत्र आळंदीत श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राज्यपालांनी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आयोजित रौप्यमहोत्सवी वर्षाच्या लोगोचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ''पुज्य ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी स्थळाच्या दर्शनाचा लाभ झाल्याने धन्य झालो. माऊलींनी चराचरातील लहानमोठ्यांना आईचे ममत्व दाखवले आहे. त्यामुळे आजही त्यांनी केलेला उपदेश समाजात प्रेरक आहे. माऊलींना प्रार्थना करतो की, आपले छत्र संपुर्ण विश्वातील प्राणीमात्रावर असावे. जेणेकरुन माऊलींच्या विचारांवर भागवतधर्म सन्मानाने चालत राहिल असा विचार कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला.'' त्यानंतर वीणामंडपात सुरू असलेल्या कीर्तनात वीणा गळयात घेऊन त्यांनी माऊलींचा गजर केला. देवस्थानच्या वतीने माऊलींची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्...

शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची नियमावली जाहीर

पुणे प्रतिनिधी: राज्यातील शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असली तरी शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यावर कोणती काळजी घ्यावी याबाबतची सविस्तर नियमावली आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. त्यानुसार कोरोना विषयक नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी शाळा, विद्यार्थी, शिक्षकसर्वांनीच घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिल्या आहेत. कन्टेन्मेंट झोनमधील शाळा सुरू करू नयेत.तसेच कन्टेन्मेंट झोनमधील विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत येण्यास अनुमती देऊ नये. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळेची स्वच्छता करून घ्यावी. शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती पध्दत टाळावी. शिक्षक व विद्यार्थी संख्या विचारात घेऊन शाळेत मुबलक ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करावी. शक्यतो शाळेत गर्दी होणारे खेळ सामूहिक प्रार्थना असे उपक्रम टाळावेत. शाळेतील जलतरण तलाव सुरू करू नयेत. सर्वांनी फेसमास्क, फेस कव्हर, हॅन्ड सॅनिटायझर यांचा पुरेसा साठा ठेवावा. कोरोना विषयक लक्षणे असणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास परवानगी देऊ नये.शाळेत दर्शनी भागात कोरोना प्रतिबंधक सं...

भीषण अपघातात माजी सरपंचासह चौघे जागीच ठार

अश्पाक मुल्ला अक्कलकोट प्रतिनिधी: एसटी आणि फॉर्च्युनर गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी गावचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह चार जण जागीच ठार झाले आहेत. ही घटना कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील बसवकल्याण जवळ घडली आहे  या भीषण अपघातात चिदानंद सुरवसे यांचा ड्रायव्हर काळे याचाही जागीच मृत्यू झाला आहे. मृत चिदानंद सुरवसे (वय ४७) यांची फॉर्च्युनर गाडी (MH13CS3330) ही कर्नाटक राज्यातील एसटी क्रमांक KA22F2198बसला धडकली आणि पलटी झाली. त्यामुळे या गाडीचा चक्काचूर झाल्याचं दिसत आहे. या अपघातानंतर चौघेही जागीच ठार झाले. सुरवसे यांच्यासोबत पवार, वाहन चालक काळे आणि आणखी एक जण होता.  त्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, चारही मृतदेह विजयपूरमधील शासकीय हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे तातडीने घटनास्थळी निघाले. त्यांच्यासोबत सुरवसे यांचे कुटुंबीयसुद्धा विजयपूरकडे रवाना झाले आहेत. चिदानंद सुरवसे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते असू...

पिकअपने दिलेल्या धडकेत मेंढपाळाच्या १४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

मंचर प्रतिनिधी: मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एकलहरे (ता. आंबेगाव) येथील मेंढपाळाच्या १४ वर्षीय मुलाला पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात होऊन या मुलाचा मृत्यू झाला आहे. याबाबतची फिर्याद वडील नामदेव रामा सूळ ( वय 50 मूळ राहणार वडगाव सावता ता. पारनेर जि. अहमदनगर ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की मेंढपाळ नामदेव सूळ हे मेंढपाळ असून कुटूंबासह गेल्या अनेक वर्षांपासून एकलहरे येथे शेतामध्ये राहत आहे. दि. २८/११/२१ रोजी त्यांचा मुलगा खंडू व ते स्वतःहा पुणे-नाशिक रस्ता ओलांडून मेंढ्यांना चारा आणण्यासाठी जात असताना. त्यांचा मुलगा खंडू नामदेव सुळ वय १४ हा सायकल वरून हायवे रस्ता ओलांडत असताना त्याला  भरधाव आलेल्या पिकअप गाडी एम. एच १२ एल. टी.४८०९ या वाहनाने धडक दिली. यात चार ते पाच मीटर त्याला फरपटत नेले. पिकअप चालक गाडीसह पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी त्याला पकडले. खंडूला रुग्णवाहिकेत द्वारे ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टर यांनी तपासून तो उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले. घटनास्थळी मंचर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. खंडू सुळ ...

मोदी सरकारने खासगीकरणाच्या नावाखाली सरकारी कार्यालये, कारखाने विकायला काढले

पुणे प्रतिनिधी: राहुल गांधी यांनी नोटबंदीवर टिका केली होती. त्यांनी सांगितले होते की नोटबंदीमुळे देशाचे फार मोठे नुकसान होणार आहे. काँग्रेस पक्षाने जी.एस.टी.च्या चूकीच्या पध्दतीने केलेल्या अमंलबजावणीला विरोध केला होता. राहुल गांधींनी मोदी सरकारला कोरोना संसर्ग बद्दल संवेदनशील राहण्यास सांगतिले होते. परंतु मोदी सरकारने त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले. आणि त्याची किंमत देशातील नागरिकांना मोजावी लागली. खासगीकरणाच्या नावाखाली सरकारी कार्यालय आणि कारखाने मोदी सरकारने विकायला काढलेले आहेत. असा आरोप छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेशजी बघेल यांनी केंद्र सरकारवर केला आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेशजी बघेल यांचे स्वागत करण्यात आले. क्रांतीसूर्य , समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा , शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान शहराध्यक्ष रमेश बागवे व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव , पश्चिम महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. '' बेरोजगार व महागाई आज देशात...

विजतोडल्यामुळे एमएसईबी कार्यालयासमोर हर्षवर्धन पाटील यांचे ठिय्या आंदोलन

 इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका भाजपाच्या वतीने दि.२७ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या शेतीचे वीजजोड तातडीने जोडावी यासाठी धरणे आंदोलन कडाक्याच्या थंडीत सुरू आहे. रात्री भाजपा नेते हर्षवर्धन पाटील , जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व इतर प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांबरोबर भाकरी , पिठलं व ठेचाखात तेथेच झोप काढत आंदोलनाची व्याप्ती वाढविली. त्यानंतर महावितरण कार्यालय प्रांगणात त्यांनी सर्व शेतकऱ्यांसमवेत ठिय्या आंदोलन सुरू केले. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा गेली ११ दिवसापासून महावितरणने पुर्णपणे खंडित केला आहे. त्यामुळे भाजपा नेते व मंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील महावितरण कार्यालयासमोर सकाळ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत चालू होई पर्यंत आमचे बेमुदत धरणे आंदोलन चालूच राहील , असे हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी आहे. राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व सहकाऱ्यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी पाटील व जगदाळे यांची भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला. दरम्यान ,...

नवजात बाळाची एक लाखात विक्री; बेकायदेशीर आश्रमातून ७१ बालकांची सुटका

कल्याण प्रतिनिधी: डोंबिवलीमध्ये एक दाम्पत्याने आपल्या पाच दिवसाच्या नवजात बाळाची बेकायदेशीररीत्या एका डॉक्टरला एक लाखात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर केतन सोनी आणि दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता , आता या डॉक्टरचा मोठा प्रताप समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार , १५ नोव्हेंबर रोजी एका जोडप्याने आपले पाच दिवसांचे बाळ विकले होते. परंतु , आई दोन दिवसांनी बाळ परत मागण्यासाठी डॉ. सोनी यांच्याकडे आली पुन्हा आली. मात्र डॉक्टरांनी त्यांचे बाळ परत देण्यास नकार दिला. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला. या माहितीच्या आधारे बाल आश्रमावर छापा टाकला आणि 71 मुलांना सोडण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे , संस्थेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जुन्या इमारतीतील २ ते १३ वयोगटातील ३८ मुलांना एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. जिल्हा आरोग्य संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव यांनी सांगितलं की , बालकांच्या प्रकृतीची कोणतीही काळजी घेतली नाही आणि ही सर्व मुले आजारी आहेत अशी माहिती दिली. कल्याणमध्ये डॉ.केतन सोनी हे नंददी...

पुण्याचा विकास भाजपमुळे खोळंबला महाविकास आघाडीचा आरोप

पुणे : प्रतिनिधी  भाजप राज्य सरकारमध्ये असताना भामा आसखेड, समान पाणी पुरवठा योजना, रिंग रोड, विमानतळ यासह अनेक प्रकल्प रखडले होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सर्वच प्रकल्पांना गती मिळाली आहे. आगामी काळात आम्ही पुण्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असा दावा महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष श्‍याम देशपांडे यावेळी उपस्थित होते. प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘पुण्याच्या विमानतळासाठी अर्थसंकल्पात ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी २६ हजार कोटीचा रिंग रोड तयार केला जाणार आहे, त्याचे ९० टक्के भूसंपादन झाले आहे. यासह अनेक कामे या सरकारने केली. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना भाजपने भडकावल्याने त्यांनी आत्महत्या केल्या.देशपांडे म्हणाले, ‘‘ महाविकास आघाडी सरकार एकत्रित प्रयत्नांमधून काम करत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा समाजकारणाचा वसा उद्धव चालवत आहे...