Skip to main content

किरकोळ वादातून जन्मदात्या बापाचा खून

प्रतिनिधी : राहुरी



गाय चे दूध काढण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यामध्ये मुलाने वयोवृद्ध असलेल्या जन्मदात्या बापाला बांबूने जबरदस्त मारहाण करून जिवे ठार मारल्याची घटना राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे दिनांक २७ ऑक्टोबर रोजी घडली. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन गजाआड केले.

या घटनेतील मयत विठ्ठल तुळशीराम हारदे य ७२ वर्षे हे राहुरी तालूक्यातील ताहराबाद येथे आपल्या कुटूंबासह राहत होते. त्यांचा मुलगा आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल हारदे हा शुल्लक कारणावरून नेहमी भांडणे करीत असे. 



काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास यातील आरोपी ज्ञानेश्वर हारदे हा दारु पिवुन घरी आला होता. त्याचे व त्याची पत्नी सविता यांच्यात गाय पिळण्याच्या कारणावरून वाद चालू होते. त्यावेळी त्याचे वडील विठ्ठल तुळशीराम हारदे हे आरोपी ज्ञानेश्वर हारदे यास म्हणाले की, तु नेहमीच दारु पित असतो. आणि शुल्लक कारणावरून भांडण करत असतोस. असे म्हणालेचा त्याला राग आल्याने तो त्याचे वडील विठ्ठल हारदे यांना म्हणाला की, तुम्ही नेहमीच माझ्या कामात अडथळा करतात. आज तुम्हाला संपवुन टाकतो. असे म्हणून जवळच पडलेला बांबू घेवून विठ्ठल तुळशीराम हारदे यांना बांबुने जबरदस्त मारहाण करुन त्यांचा निर्घृण खूण केला. विठ्ठल हारदे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.



घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके, पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे, पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव, निरज बोकील आदिंसह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आरोपीला ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केले. सर्जेराव म हिपती हारदे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल हारदे याच्या विरोधात खुणाच्या गुन्हयाची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक भागचंद सुर्यवंशी हे करीत आहेत.





पॉप्युलर

सहाय्यक फौजदाराची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या..

मंचर प्रतिनिधी: मंचर पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असलेले एकनाथ ठकाजी वाजे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्याघटना केल्याची खळबळजनक बुधवार दिनांक .२५ मे २०२२ रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. याबाबत त्यांचे जावई आदित्य रवींद्र गभाले(वय.२५ वर्षे) रा.मुक्ताई नगर नारायणगाव,ता.जुन्नर,जि.पुणे यांनी खेड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की,फिर्यादी यांची पत्नी दिनांक.२३ मे २०२२ रोजी माहेरी चांडोली,ता.खेड येथे आई-वडिलांकडे गेल्या होत्या.दिनांक.२५ मे रोजी फिर्यादीची पत्नी सुप्रिया हिने तिचा पती यास फोन करून वडील एकनाथ वाजे यांनी शेजारी असणाऱ्या मोकळ्या १३ नंबर रूममध्ये स्वतःला कोंडून घेतले असून आम्ही बराच वेळ दरवाजा वाजूनही ते दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले.त्यानंतर कुटुंबियांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास कुटुंबियांनी रूमचा दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले असता एकनाथ वाजे यांनी बेडरूममधील हुकाला रस्सी बांधून गळफास घेतल्याचे दिसले.एकनाथ वाजे यांचा गळफास सोडून त्यांना खाली घेऊन ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून ते उप...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाचा खून; पाच जणांना अटक.

पुणे प्रतिनिधी: हॉटेल पार्किंग मधील गाडी काढण्यावरुन झालेल्या वादात चौघा जणांनी सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाला बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.   नरेंद्र रघुनाथ खैरे (वय ३३ वर्षे ) रा. आंबेगाव बु. असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.   युवराज जंबु कांबळे , ओंकार अशोक रिठे , वैभव पोपट अदाटे , मनोज दत्तात्रय सूर्यवंशी , विष्णु कचरु कदम रा. नर्‍हे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.   याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आशिष रमेश कवठेकर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना   साई विश्व सोसायटी , न्यू प्यारा बार समोरील पार्किंगच्या जागेत घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपींनी संगनमत करुन पार्किंगमधील गाडी काढण्याचे कारणावरुन नरेंद्र खैरे यांना बेदम मारहाण केली.   त्यानंतर तिघा जणांनी त्याला उचलून श्री साई मोटर्स येथे ठेवून दिले. चारही आरोपींनी नरेंद्र खैरे याच्या खिशातील पाकीट , मोबाईल , हेडफोन इत्यादी वस्तू चोरुन नेल्या. मंगळवारी सकाळी ...