खेड प्रतिनिधी:
खेड तालुक्यातील कडुस येथील पानमंदवाडी, कारामळी परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी सुमारे दहा घरे आणि दुकाने फोडत रोख रक्कम पळवून नेल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
कडूस सोपान सिताराम पानमंद, दत्तु पानमंद, दत्तात्रेय पानमंद, रामभाऊ पानमंद, तर कारामळी परिसरातील दिपक काळोखे, दिलीप काळोखे, रविंद्र धोडिभाऊ गारगोटे, आदी नागरिकांची बंद असलेली घरे टारगेट करून फोडली आहेत. घटना कळताच पोलिस पाटील सुशिल पोटे, नवनाथ काळोखे, यांनी भेट देऊन पहाणी केली.
रात्री १२ वाजल्यानंतर ते पहाटेच्या सुमारास परिसरात बंद असलेल्या घरांचा दरवाजा व कडी कोयंडा कटावणीने तोडून चोरट्यांनी घरातील कपाटांची सामान