मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कामाची पद्धत नवोदित आमदारांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारी - आमदार अतुल बेनके
मंचर प्रतिनिधी:
राज्य सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुढे जेव्हा जेव्हा अडचणी उभ्या राहतात. तेव्हा तेव्हा संकटमोचक म्हणून दिलीप वळसे पाटील उभे राहतात. दिलीपराव वळसे पाटील एकमेव मंत्री आहेत की ज्यांना न मागता गृहमंत्रीपद मिळाल्याचे राज्यातील जनतेने पहिले आहे. ते माझे आधारस्तंभ आहेत, त्यांच्या कामाची पद्धत आमच्यासारख्या नवोदित आमदारांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारी आहे,” असे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबिर सांगता समारंभ व गरजू मुलांना शालेय साहित्य वाटपप्रसंगी बेनके बोलत होते. यावेळी मावळ चे लोकप्रिय आमदार सुनिलआण्णा शेळके, पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेश लंके, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब बेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव तालुका अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवदत्त निकम, नगरसेवक गणेशजी खांडगे, जि.प.सदस्य विवेकदादा वळसे पाटील, पंचायत समिती सभापती संजय गवारी, जिल्हा परिषद सदस्या अरुणाताई थोरात, तुळशीताई भोर, पंचायत समिती सदस्या उषाताई कानडे, आशाताई शिंगाडे, ज्येष्ठ नेते गुलाबशेठ नेहरकर, माजी सभापती सुभाष मोरमारे, संचालक विनायक तांबे, दत्ताशेठ थोरात,मा.सभापती वसंतराव भालेराव, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष सुषमाताई शिंदे, युवक अध्यक्ष अंकित जाधव, मंचर शहर अध्यक्ष विश्वास बाणखेले यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बेनके म्हणाले की “ऊर्जा खाते अडचणीत होते. भारनियमाने जनता त्रस्त झाली होती, त्यावेळीही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वळसे पाटील यांच्याकडे उर्जा खाते सोपविले होते. उर्जा खात्याची प्रतिमा त्यांनी उंचाविली. त्याप्रमाणेच गृहखात्याचीही कामगिरी समाजाभिमुख करून पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धैर्य वाढवण्याचे काम करतील. सलग सात वेळा ते वाढत्या मताधिक्याने आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी मतदारसंघाचा नियोजनबद्ध विकास केला आहे. वळसे पाटील यांच्या गैरहजेरीतही देवेंद्र शहा व बाळासाहेब बेंडे हे व्यवस्थित नियोजन करून जनतेची कामे करतात. त्यामुळे आरोग्य, शिक्षण व अन्य पायाभूत सुविधांमध्ये हा मतदार संघ अग्रेसर आहे.
मंचरजवळ तांबडेमळा गोरक्षनाथ टेकडी परिसरात १२० कोटी रुपये खर्च करून २०० बेडचे हॉस्पिटल दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नांतून लवकरच होणार आहे. आमदार अतुल बेनके यांनी आमदार निधीतून एक कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी देवेंद्र शहा यांनी केली होती. हा धागा पकडून बेनके म्हणाले “वळसे पाटील यांनी सांगितल्यानंतर आमदार निधीतून एक कोटीच काय मी चार कोटी रुपयेही देईल. कारण, जुन्नर तालुक्यातील रुग्णांना येथे चांगल्या आरोग्य सुविधा मिळतात.