लोणी काळभोर प्रतिनिधी:
उरुळी कांचन येथील संतोष जगताप यांचेवर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य सुत्रदाराच्या मुसक्या आवळण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश मिळाले असून त्यास न्यायालयाने दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले की, पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांचेवर गोळीबार करण्यात आला यात जगताप जागीच ठार झाला तर दोन अंगरक्षक गंभीर जखमी झाले तर प्रत्युत्तरादाखल जगताप यांच्या अंगरक्षकानी गोळीबार केला त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झाला तर अन्य पळून गेले होते त्यापैकी पवन मिसाळ व महादेव आदलिंग या दोघांना पळसदेव येथून अटक करण्यात आली होती त्यांच्याकडून मिळालेल्या माहिती वरून या हल्ल्यात मुख्य सूत्रधार उमेश सोपान सोनवणे रा राहू ता दौड हा मात्र हाती लागला नव्हता यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोकाशी यांनी सोनवणे यास पकडण्यासाठी तपास पथकास सुचना दिल्या.
तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की,उमेश सोनवणे हा कानिफनाथ हाँटेल पिर फाटा ता शिरूर येथे येणार आहे याबद्दल त्यांनी वरिष्ठ अधिकारी मोकाशी याना याची माहिती दिली त्यांनी पथकासह तेथे सापळा रचून त्यास अटक करण्याच्या सूचना दिल्या. यावर पथकासह राजू महानोर तेथे पोहोचले व मिळालेल्या माहितीनुसार उमेश सोनवणे तेथे आला पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणले व न्यायालयात हजर केले त्यावर न्यायालयाने त्यास दहा दिवसाची कोठडी सुनावली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर,पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक सुनील नागलोत, अमित साळुंखे,श्रीनाथ जाधव, संभाजी देवकर, पोलीस शिपाई बाजीराव वीर,निखिल पवार, शैलेश कुदळे,राजेश दराडे,दिगंबर साळुंखे या पथकाने केली.