प्रतिनिधी : जुन्नर
श्री क्षेत्र पारुंडे ता. जुन्नर येथील अखिल
भारत वर्षीय अवधूत भेष बारह पंथ योगी महासभेचे श्री ब्रह्मनाथ मठाचे मठाधिपती
अजयनाथ गुरुपीर शेरनाथ यांनी पाचव्या दिवशी(शुक्रवार,ता.३०) रोजी रात्री आपले उपोषण मागे घेतले.
पारुंडे येथील ब्रह्मनाथ व ज्वालानाथ यांचे
समाधी मंदिर गावच्या ट्रस्ट मधून मुक्त करून अवधूत भेष बारह पंथ योगी महासभेकडे
सुपूर्द करावे. जुन्या गोशाळेची जमीन मोकळी करून तेथे गोशाळा बांधण्यासाठी पाच लाख
रुपये अनुदान द्यावे. सर्व ग्रामस्थांच्या संमतीने मठाधिपती यांच्या अध्यक्षतेखाली
नवीन विश्वस्त मंडळ नियुक्ती करण्यात यावी या तीन प्रमुख मागण्यांसाठी सोमवार
ता.२५ पासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.