शिक्रापूर प्रतिनिधी:
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतून अनेक ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना शेकडो दुचाक्या वर्षभरात चोरीला गेलेल्या असताना आता चक तळेगाव ढमढेरे पोलीस चौकीसमोरुनच एका इसमाची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर संजय दगडे हे काही कामानिमित्त गावात आलेले असताना त्यांनी त्यांची एम एच १२ जे ई ३५२९ हि दुचाकी पोलीस चौकी शेजारील ग्रामपंचायत कार्यालय जवळ अमर ज्योत मित्र मंडळ समोर लावली होती, थोड्या वेळाने दगडे हे त्यांचे काम आटपून पुन्हा त्या ठिकाणी आले असताना त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नसल्याने त्यांनी शेजारी, आजूबाजूला सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला मात्र दुचाकी दिसली नसल्याने आपली दुचाकी चोरीला गेल्याची खात्री झाल्याने संजय विठ्ठल दगडे वय ३० वर्षे रा. बेलदारवाडी तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील पोलीस हवालदार जितेंद्र पानसरे हे करत आहे.