प्रतिनिधी : पिंपरी
दुचाकीवरचा प्रवास आधीच खड्डे आणि
रस्त्यांच्या कामकाजामुळे जीवघेणा झाला आहे. त्यात मेट्रोचे काम सुरु आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी खोदाई सुरु आहे. रस्ता अरुंद झाला आहे. बीआरटीतून वाहनांना
प्रवास करण्याची वेळ येत आहे, अशा परिस्थितीत बोपोडी
जुना जकात नाका या ठिकाणी १९ वर्षाच्या चिन्मय वाखारेचा दुचाकीवरुन प्रवास करत
असताना मांजाने गळा चिरला आहे. दैव बलवत्तर म्हणून तो अपघातातून बचावला आहे. परंतु,
मांजावर बंदी घालावी अन्यथा, प्रशासनाने
पतंगबाजी करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली
आहे.
फुगेवाडी श्री स्वामी समर्थ नगरमध्ये राहणारे वाखारे कुटुंब. दिवाळीची खरेदी करण्यासाठी चिन्मय शुक्रवारी (ता.२८) पुण्यात गेला होता. सध्या तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगला आहे. कुटुंबात तो एकुलता एक आहे. पुण्याहून फुगेवाडीकडे घराच्या दिशेने तो निघाला होता. रस्त्याने आनंदात त्याचा प्रवास सुरु होता. मात्र, सायंकाळी ६.३० वाजता बोपोडी रेल्वे क्रॉसिंग नजीक चिन्मयचा जीव जाता-जाता वाचला. मांजाने गळा खोलवर चिरला. त्वरित त्याला खासगी व खडकी कॅटोन्मेंटच्या दवाखान्यात दाखल गेले.
डॉक्टरांनी उपचार केले.
सुदैवाने गळ्याला टाके पडले नाहीत. डोक्यात हेल्मेट असल्याने धोका टळला. परंतु,
मांजा कापताना त्याने जीव वाचविण्यासाठी हात मध्ये केला. हात देखील
मोठ्या प्रमाणात चिरला. त्यामुळे, मोठी दुखापत हाताला व
गळ्याला झाली. कुटुंबीय या घटनेने मात्र हादरुन गेले.