भोसरी प्रतिनिधी:
कार आणि दुचाकीच्या धडकेत सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. केंद्रीय विद्यालयाजवळ, फुगेवाडी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजु मनोज यादव (वय ४०) मनोज ननकु यादव (वय ४०) आणि सुरेंद्र कुमार सारंगी (वय ४५, पुणे) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. शशी शंकर राजु (वय ४५) असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे.
याप्रकरणी राजेश हिरालाल यादव (वय ३४, रा. काळेवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शशी याने आपली एम एच ०४/ जी झेड ३९८२ या चारचाकी गाडीने फिर्यादी यांची बहीण एम एच १४/ एन एफ १५९९ हिला जोरची धडक दिली यामध्ये फिर्यादी यांच्या बहिण व इतर दोघे जण गंभीर जखमी झाले तर, फिर्यादी यांच्या बहिणीची सहा वर्षीय मुलगीचा मृत्यू झाला आहे.