प्रतिनिधी :शिर्डी
शिर्डी शहरात अवैध गुटखा विक्री मोठ्या
प्रमाणावर सुरू आहे. याकडे अनेक वेळा लक्ष वेधल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन आणि
प्रतिबंधित हिरा पान मसाला व इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यास शिर्डीतून
पकडले असून त्याच्याकडून बारा हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न
सुरक्षा अधिकारी राजेश बढे यांनी दिली. शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर
३४३ / २०२१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आशिष अशोकलाल खाबिया वय ३० शिर्डी हा गेल्या अनेक दिवसापासून शिर्डी परिसरात गुटखा साठा करून विक्री करत असल्याची तक्रार आल्याने आशिष खाबिया याच्या घरी छापा टाकून १२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार दिनांक २४ ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत काम काजासाठी आशिष अशोक लाल खाबिया यांचे भाडेतत्त्वावरील राहते घरी अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे सहाय्यक कसबेकर ,पंच अमोल बडे यांनी समक्ष आशिष खाबिया हजर असताना त्याची चौकशी केली असता प्रतिबंधित अन्नपदार्थ पानमसाला व सुगंधित तंबाखू शाखा स्वतः च्या मालकीचा असल्याचे त्याने सांगितले त्याच्याकडून बारा हजार रुपये चा माल जप्त करण्यात आला आहे.
शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आशिष खाबिया यास अटक
करण्यात आली असून या कारवाईमुळे गुटखा विक्री करणाऱ्या लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली
आहे.राहता तालुक्यात असे अनेक जण गुटखा विक्री करून लाखो रुपये कमवत असल्याचे
दिसून येत असून या पुढील काळातही अशाच पद्धतीने कठोर कारवाई होण्याची गरज निर्माण
झाली आहे.