पुणे प्रतिनिधी:
पुणे,कॅडेलिया
क्रुझ पार्टी दरम्यान अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सोबत सेल्फी घेणारा,
या प्रकरणात एनसीबीचा साक्षिदार असणाऱ्या किरण गोसावीला पुणे
पोलिसांनी अटक केली आहे.
कात्रज-मांगडेवाडी येथील एका लॉजमधून पहाटे साडेतीन वाजता त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान सोमवारी पुणे पोलिसांचे एक पथक त्याचा माग काढत लखनौमध्ये गेले होते. तेथून त्याने पोलिसांना गुंगार देत पळ काढला होता.
गोसावी मागील काही दिवस वृत्त वाहिण्यांच्या
संपर्कात होता. तो सातत्याने वृत्त वाहिण्यांना बाईट देत शरण येत असल्याचे सांगत
होता. मात्र ही शरणागती महाराष्ट्राबाहेर पत्करणार असल्याचे जाहिर केले होते.
त्याच्या मागावर पुणे पोलिस आणी गुन्हे शाखेची पथके होती. त्याला अटक केल्याची
माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस
आयुक्त(गुन्हे) रामनाथ पोकळ, उपायुक्त(गुन्हो)
श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस उपायुक्त लक्ष्मण बोऱ्हाटे
उपस्थित होते.