शिरूर प्रतिनिधी: पिंपळे जगताप ता. शिरुर येथील शेतातील एका घरातून अज्ञात चोरट्यांनी सिलेंडर, फ्रीज, इलेक्ट्रिक मोटारसह आदी साहित्य चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पिंपळे जगताप ता. शिरुर येथे दिवाकर रास्ते यांचे शेत असून त्यांनी शेतामध्ये देखील घर बांधलेले आहे, त्यांच्या घरामध्ये त्यांनी सिलेंडर, फ्रीज, इलेक्ट्रिक मोटार यांसह आदी साहित्य ठेवलेले आहे, २८ ऑक्टोबर रोजी रास्ते हे त्यांच्या शेतातील घराकडे गेलेले असताना त्यांना दरवाजाचे कुलूप तुटले असल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांनी घरात पाहणी केली असताना घरातील साहित्य अस्ताव्यस्थ पडलेले दिसून आले. त्यामुळे त्यांनी घरात पाहिले असताना घरातील तीन सिलेंडर, दोन शेगडी, एक फ्रीज, तीन पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारसह आदी साहित्य चोरीला गेल्याचे दिसले त्यामुळे याबाबत दिवाकर काशिनाथ रास्ते वय ८३ रा. दिनदयाळ सोसायटी कात्रज पुणे १५ यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरी...
समर्थ भारत माध्यम समूह