शिरूर प्रतिनिधी:
धामारी ता. शिरूर येथे रस्त्याच्या वादातून दोघा महिलेंना शिवीगाळ, दमदाटी करत महिलेंशी अश्लील वर्तन केल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शिवाजी शहाजी डफळ यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
धामारी ता. शिरूर येथील शिवाजी डफळ यांच्या रस्त्याच्या वाद सुरु असून शिवाजी डफळ हे २८ सप्टेंबर रोजी दारू पिऊन सदर रस्त्याने आले त्या ठिकाणी असलेल्या दोन महिलांना शिवीगाळ, दमदाटी करत अश्लील शब्दांत महिलांना डफळ यांनी शिवीगाळ केली, दरम्यान दोन्ही महिलेंसमोर शिवाजी डफळ यांनी अश्लील वर्तन देखील केले याबाबत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी शिवाजी शहाजी डफळ रा. धामारी ता. शिरूर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय चौधर हे करत आहे.