पुणे
प्रतिनिधी:
पुणे
दि. 29 : राज्य शासन महिलांच्या सुरक्षेला
सर्वोच्च प्राधान्य देत असून महिलांवरील अत्याचाराच्या घटना ही चिंतेची बाब आहे.
महिलांवरील अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर वाचक ठेवणे आवश्यक आहे. महिला
सुरक्षेबाबत पोलीस प्रशासन, महिला दक्षता समिती तसेच महिलांच्या प्रश्नासंदर्भात काम करणाऱ्या
सामाजिक संघटना यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या
उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी दिले.
शासकीय
विश्रामगृह येथे महिला सुरक्षेबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस
आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी
चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख
उपस्थित होते.
गोऱ्हे म्हणाल्या, साक्षीदार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. महिलांना होणाऱ्या त्रासबाबत त्वरित माहिती मिळावी यासाठी सीसीटीव्ही संख्या वाढविणे, गस्त वाढविणे, वारंवार घटना घडणाऱ्या ठिकाणी पथदिव्यांची सोय करणे गरजेचे आहे. महिला सुरक्षिततेच्यादृष्टीने याबाबतची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. पॉक्सो कायद्याअंतर्गत प्रलंबित केसेस तात्काळ निकाली काढण्याच्यादृष्टीने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधी व न्याय विभागाच्या संदर्भातील प्रलंबित प्रश्नाबाबत आपण मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगून श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवास करताला महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी यंत्रणा सतर्क ठेवावी. रेल्वे पोलीस, राज्य पोलीस दल यांना सीसीटीव्ही संख्या वाढविणे व ऑनलाईन देखरेख कार्यक्षम करून गुन्हे जागीच रोखणे, महिलांच्या तक्रारी लवकर समज़ुन माहिती होण्यास व्हाट्सअप ग्रुप करणे, तसेच सामाजिक संघटनांचा पोलीसांच्या तपासात, पिडीतांच्या समुपदेशनात सहभाग वाढविण्याबाबत सूचनाही त्यांनी दिल्या. भरोसा सेल सक्षमीकरण, महिलासाठी स्व मदत गटांची स्थापना, महिलांचे समुपदेश, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल वेळेत यावेत यासाठी सबंधित यंत्रणेने विशेष प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी
यावेळी पोलीस आयुक्त गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहपोलीस आयुक्त डॉ. शिसवे, पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी आपल्या क्षेत्रातील महिला
सुरक्षेच्यादृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना याबाबत माहिती दिली.