शिरूर प्रतिनिधी:
ट्रॅक्टर
चोरून डिक्ससह टायरचीही चोरी करणाऱ्या आरोपींना शिरूर पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने
हेरले अन् आरोपींना गजाआड व्हावे लागले
याबाबत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत सहायक पोलिस
निरीक्षक किरण उंदरे हे सहकाऱ्यांसह रात्रीच्या वेळी गस्त घालत होते. यावेळी
संशयित वाहनाची पोलिसांकडून तपासणी करत होते. याच दरम्यान एक बिगर नंबरचा ट्रॅक्टर
न्हावरे फाटा येथे जात असल्याचा दिसून आला.
यावेळी सहायक
पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी चालकाकडे विचारपूस केली. याचवेळी चालकाने
उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना अधिक संशय आला. पोलिसांनी चालकास
ताब्यात अधिक चौकशी केली असता, आरोपी संभाजी रामदास धरणे (रा. रामलिंग, शिरूर) याने
सदर ट्रॅक्टर बकोरी, तालुका हवेली येथून चोरला असल्याचे सांगितले.
तसेच रिलायन्स पेट्रोल पंपच्या मागे असणाऱ्या बालाजी मोटर गॅरेज येथून ट्रकचे दोन टायर डिक्स सह चोरले असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी चोरलेला ट्रॅक्टर तसेच टायर असा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीवर लोणीकंद व शिरूर पोलिस स्टेशन येथे यापूर्वीचे चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती निष्पन्न झाली आहे.
ही कामगिरी शिरूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे, सहायक फौजदार माणिक मांडगे, पोलिस नाईक शिवाजी बनकर, संतोष साळुंके, शिवाजी बनकर, प्रवीण पिठले यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिवाजी बनकर हे करत आहेत.