कोल्हापूर
प्रतिनिधी:
जंगलात आणि शेतात दिसणारा बिबट्या आता थेट
घरात दिसायला लागल्यावर तुम्हालाही भिती वाटेल. पण असाच धक्कादायक प्रकार
कोल्हापूरमध्ये समोर आला आहे. कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या थेट किचनमध्ये शिरला.
हे पाहून सगळ्यांनाच घाम फुटला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील
तिलारीनगरजवळ असलेल्या कळसगादे पैकी बांदराई धनगरवाड्यात ही घटना मंगळवारी रात्री
घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्याच्या मागे
मागे बिबट्या घरात शिरला. घरतल्या काही लोकांनी हे पाहिलं आणि तातडीने
कुटुंबियांना बाहेर काढलं. इतकंच नाहीतर मुख्य दारालाही कडी लावली. याची माहिती
लगेच वनखात्याला देण्यात आली. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा आणला. पण पाऊस, दाट धुक्याचा आधार
घेत बिबट्या पसार झाला.
रामु भागु लांबोर यांच्या घरात कुत्र्याचा पाठलाग
करत शिरलेल्या बिबट्याने सहा तास नागरिकांचा श्वास रोखून धरला. प्रंसगावधन राखून
लांबोर यांनी बाहेर पडून दाराची कडी लावल्याने अनर्थ टळला. कळसगादे पैकी
बांद्राईवाडा येथे मंगळवार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुर्ण वाढीचा बिबट्या
भक्षाच्या शोधात आला. रामु लांबोर यांच्या दारात भाकरी खाणाऱ्या कुत्र्यावर हल्ला
करत बिबट्या पाठलाग करत सरळ जेवण खोलीत शिरला.
लांबोर यांच्या
प्रापंचीक साहित्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. वनक्षेत्रपाल.पी.ए.आवळे
वनपाल.बी.आर.भांडकोळी, वनपाल डि.एच.पाटील वनरक्षक डि.एम.बडे, वनमजुर. मोहन तुपारे, तुकाराम गुरव व इतर कर्मचारी उपस्थित होते.
रेस्क्यु टीमचे डॉ.वाळवेकर व त्यांची टीम यांनी देखील सदर मोहिम पार पाडण्यास विशेष
मेहनत घेतली.
तेथे लांबोर कुटुंबियांनी ओरडा - ओरड
केल्यानंतर बिबट्या चुलीवरील तुळईवर चढला. त्यावेळी समय सुचकता दाखवत लांबोर यांनी
आपली पत्नी साऊबाई, मुलगी निकिता, मुलगा सुभाष, दोन वर्षाचा मुलगा व विवाहीत मुली - लक्षी व नखलाताई व चार
नातवंडे मोठ्या शिताफीने घराबाहेर काढले. घराला बाहेरुन कडी घातली व रहायला
शेजारील घरात गेले.
दरम्यान, वनविभागास फोन करून घटनेची माहिती दिली. मुसळधार पाऊस व दाट धुक्यात वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व ग्रामस्थांसह पाहणी केली. घटनेचे गांर्भीय ओळखून वनविभागाने कोल्हापुर येथील डॉ.संतोष वाळवेकर ( पशुधन अधिकारी ) यांच्या रेस्क्यु टीमला पाचारण केले. रेस्क्यु टीम पहाटे चारच्या सुमारास पाटणे येथे दाखल झाली. मात्र, विदयुत पुरवठा खंडीत झाल्याने तसेच मुसळधार पाऊस व दाट धुक्यामुळे सकाळी सहा वाजता स्थानिक ग्रामस्थ आणि रेस्क्यु टीमचे सदस्य व वनविभाग यांनी घटनास्थळी पिंजरा जाळी , दोरखंड व इतर साधन सामुग्रीसह दाखल झाले.
घरमालक लांबोर यांनी
पहाटेच्या अंधारात खिडकीचा पत्रा वाकवुन, वाट
करुन बिबट निघुन गेलेची शंका व्यक्त केली. मात्र, धोका
न पत्करता वनविभागाने एका दरवाजास पिंजरा लावला व मोठयाने आरडा -ओरडा करुन
हुसकावले. मात्र, बिबट्याची हालचाल दिसुन आली नाही. त्यानंतर सदर
घरात कुत्रे सोडण्यात आले व सभोवतालच्या खिडकी मधुन बॅटरीच्या प्रकाशात संपुर्ण घर
शोधले मात्र काहीच सुगावा न लागल्याने अखेर धाडसाने वनविभागाने घरमालकासह आतमध्ये
जाऊन खात्री केली असता खिडकी जवळील ओरखडे, विसखटलेले
साहित्य, उचकटलेले खिडकीचे रिलींग तसेच तेथे बिबट्याचे
लागलेले व पडलेले केस यावरुन बिबट्या पहाटेचा अंधार, पाऊस, धुक्याचा फायदा घेऊन मुळ अधिवासात निघुन गेला
असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला.