पुणे
प्रतिनिधी:
शिवाजीनगर
येथील खुडे ब्रिजखाली एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता. वैद्यकीय अहवालानुसार
या इसमाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. दरम्यान, या खूनाची बातमी देणारेच या खूनी
असल्याचे तपासातून समोर आले आहे.
शिवाजीनगर
पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणत दोघांना ताब्यात घेतले आहे.महेश शिवाजी देव उर्फ
तंबी (वय 30, रा. खुडे ब्रिजजवळ शिवाजीनगर,
पुणे)
आणि आकाश प्रकाश यादव (वय 33, रा. नवी शनिवार पेठ,
पुणे)
असे याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात इसमाचा झालेल्या खूनाचा तपास सुरू
केल्यानंतर 255 सीसीटीव्ही फुटेज बघुन, तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच
रस्त्यावर कचरा वेचणारे, भंगाराचे दुकानदार,
भीक
मागणारे तसेच गोपनीय बातमीदार असे तब्बल 70 ते 75 लोकांकडे चौकशी केली. परंतु
कोणतेही धागेदोरे हाती आले नाहीत. तपास किचकट होत जात असताना काही प्रत्यक्षदर्शी
साक्षीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली.
चौकशीअंती आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.