शिंगवे (पारगाव) येथील ग्रामपंचायत शिंगवेच्या माध्यमातून घरपट्टी पाणीपट्टी वेळेत भरणाऱ्या ग्रामस्थांना बकेट भेट
पारगाव शिंगवे प्रतिनिधी:
आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून घरपट्टी पाणीपट्टी वेळेत भरणाऱ्या ग्रामस्थांना मोफत बकेट देण्याची संकल्पना राबवण्यात आली.
यामध्ये ज्या खातेदाराचे सर्व ग्रामपंचायत कर व ग्रामपंचायतची कुठलीही थकबाकी नसलेल्या ग्रामस्थांना भेट म्हणून बकेटचे वाटप करण्यात आले,असल्याची माहिती शिंगवे गावचे सरपंच सिता राम पवार , उपसरपंच संतोष नामदेव वाव्हळ यांनी दिली.
हि संकल्पना राबवत असताना घरीपट्टी पाणीपट्टी वसुल होण्यास मदत होणार असल्याचे माहिती शिंगवे ग्रामविकास अधिकारी यू. ऐ. शिंगाडे यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हिरामण गोरडे, खंडु वाव्हळ, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
ही संकल्पना राबवण्यात आल्यामुळे सर्वच स्तरावर शिंगवे ग्रामपंचायतचे कौतुक होत आहे.