शिरूर प्रतिनिधी: गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या येथील तरूण बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह आज (ता. २९) सकाळी, पुणे - नगर रस्त्यावरील नारायणगव्हाण (ता. पारनेर) शिवारातील विहिरीत आढळून आल्याने व त्याच्या चेह-यावर आणि शरीरावर मारहाणीच्या खूणा आढळून आल्याने खळबळ उडाली. 'आमच्या मुलाचा खून करून त्याला विहीरीत फेकून दिले असून, आरोपींना तात्काळ अटक करावी', या मागणीसाठी शिरूरमधील तरूणांनी व मृत बांधकाम व्यावसायिकाच्या नातेवाईकांनी सुमारे दोन तास पुणे - नगर रस्ता रोखून धरल्याने नारायणगव्हाण परिसरात मोठा गोंधळ झाला. आदित्य संदीप चोपडा (वय २४, रा. हुडको वसाहत, शिरूर) असे मृत बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्याच्या कुटूंबियांनी दिलेल्या माहितीनूसार, आदित्य सोमवारी (ता. २७) कडूस या मूळगावी गेला होता. तेथून परतताना रात्री सात वाजण्याच्या सुमारास त्याने कुटूंबियांशी संपर्क साधून बेलवंडी फाटा येथे असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर त्याचा संपर्क झाला नाही. रात्री आठ नंतर त्याचा मोबाईलही बंद लागल्याने त्याच्या कुटूंबियांनी व हुडको परिसरातील तरूणांनी बेलवंडी फाटा, वाडेगव्हाण, नारायणगव्हाण ...
समर्थ भारत माध्यम समूह