शिंगवे प्रतिनिधी:
शिंगवे (ता .आंबेगाव ) येथील भैरवनाथ विद्यालय शिंगवे शाळेतील
पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिट लिस्ट मध्ये आल्याने शिंगवे शाळेच्या
शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सानिका अविनाश धरम,ऋतुजा अशोककुमार वाव्हळ, अजित आबाजी वाव्हळ,आकांशा सावन राठोड या सर्व
विद्यार्थ्यांनचे व एन एम एम एस शिष्यवृत्ती विभाग प्रमुख नितिन पडवळ, मार्गदर्शक शिक्षक कीरण लायगुडे, सागर वाव्हळ, मंगेश धराडे, यांचे विद्यालयाचे अध्यक्ष, संचालक सरपंच, ग्रामस्थ शिंगवे यांच्यातर्फे अभिनंदन
करण्यात आले.
आजपर्यंत विद्यालयाचे ८० विद्यार्थी मेरिटमध्ये आले असून
त्यांना २५ लाखांपर्यंत शिष्यवृत्ती मिळाली आहे.
ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण
मिळावे व पुढील शिक्षणास मदत व्हावी, यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. पूर्व
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ,
नवोदय प्रवेश परीक्षा ,एन.टी.एस परीक्षा , प्रज्ञाशोध परीक्षा अशा विविध स्पर्धा
परीक्षांमध्ये उज्वल यशाची परंपरा या शाळेला लाभली आहे . तसेच क्रीडा स्पर्धा , सांस्कृतिक स्पर्धा , विज्ञान प्रदर्शन, शैक्षणिक साहीत्य निर्मिती अशा सहशालेय
उपक्रमांमध्येही शिंगवे शाळा तालुक्यात अव्वल असते.
लॉकडाऊनच्या काळातही शिक्षकांनी अभ्यासात खंड पडू न देता
विद्यार्थ्यांना आँनलाईन व मळ्यात जाऊन वैयक्तिक मार्गदर्शन केले .
"एन एम एम एस परीक्षेत मेरिट लिस्टमध्ये
विद्यार्थी येण्यासाठी लॉकडाऊन मध्येही मार्गदर्शन सुरू ठेवले .त्यामुळे
नियमित सराव आणि सातत्य राहिले व यश
संपादन करता आले. यापुढेही यशाची परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न राहील .