राजुरी
प्रतिनिधी:
राजुरी
येथील गव्हाळी मळयामधील तीन वर्षाच्या
बालकाला बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या
सुमारास घडली.
याबाबत
मिळालेल्या माहितीनुसार राजुरी (ता.जुन्नर)येथील गव्हाळी मळ्यातील रहात असलेले
अक्षय चासकर यांचा तिन वर्षाचा लहान मुलगा वेद अक्षय चासकर (वय ३) अंगणात खेळत
असताणा बिबटयाने अचानक पणे या बालकावर हल्ला करून त्या बालकास घराजवळच असलेल्या
ऊसाच्या शेतात फरफटत नेले.मुलाचा मोठा रडण्याचा आवाज आल्यानंतर घरातील लोक बाहेर
आल्यानंतर स्थानिक नागरिकांणी ऊसाच्या शेतात घेराव घालून मोठा आरडाओरड केला .मोठा
आवाज आल्याने बिबटयाने त्या मुलाला शेतात
सोडुन या ठिकाणाहून पळ काढला .
स्थानिक नागरिक या जखमी बालकाला आळेफाटा येथील
एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले होते.परूतु हल्ला मोठ्या प्रमाणावर झाला
असल्याने या बालकाला पुणे या ठिकाणी पुढील
उपचारासाठी हलवले आहे.
दरम्यान आळेफाटा परीसरात दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणावर होत असुन वनविभाग याकडे
पुर्णपने दुर्लक्ष करत आहे. या परीसरातील ग्रामस्थांनी राजुरी परीसरात पिंजरा
लावण्याची मागणी होत आहे.