पुणे प्रतिनिधी:
पब्जी
गेमनं कित्येक मुलांची व घरांची वाट लावली आहे. तरी या मुलांचा पब्जीचा नाद काही
सुटत नाही.अनेक पालकांनी मुलांना ऑनलाइन लेक्चर करण्यासाठी मोबाईल घेऊन दिले आहेत.
मात्र मुले त्याच्यावर तासनतास पब्जी गेम
खेळत आहे. व त्यातून पालकांचे मोठे नुकसान होत आहे.
जोगेश्वरीमध्ये
राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुलाला पब्जी खेळण्याचं अक्षरशः व्यसन होतं. पब्जी खेळता
खेळता त्यानं आई वडिलांच्या अकाऊण्टमधून तब्बल १० लाख रुपये खर्च केले पैसे
संपल्यावर मुलगा घाबरला. तो घर सोडून पळून गेला. व जाता जाता त्यानं चिठ्ठी
लिहिली. जोपर्यंत मी कमवत नाही, तोपर्यंत परतणार नाही. या बाबत मुलगा अल्पवयीन असल्यानं पोलिसांना
अपहरणाचा संशय आला व त्यानी त्याचा शोध सुरू करत या मुलाला पोलिसांनी १२ तासांच्या
आत शोधून काढत त्याचं काऊन्सिलिंग करुन त्याच्या आई वडिलांकडे सोपवलंय.
हा
मुलगा अभ्यासासाठी आईचा मोबाईल वापरायचा. तो पब्जी खेळू लागला. विविध टास्कच्या
नादात त्याने आईच्या मोबाईलमधून अकाऊण्टमधले तब्बल १० लाख खर्च केले. त्यामुळे खात्याला
मोबाईल नंबर लिंक असेल तर पालकांनो काळजी घ्या. वारंवार अकाऊण्ट डिटेल्स चेक करत
राहा. पब्जीनं अनेक घरांचं वाट्टोळं केलंय.
ती वेळ तुमच्यावर येऊ नये, असं वाटत असेल तर मुलांवर नीट लक्ष ठेवा.