घोडेगाव प्रतिनिधी:
घोडेगाव पोलिस ठाणे हद्दीतील दारू तयार करून विक्री
करणारे यांच्या बरोबरच त्यासाठी कच्चामाल पुरवणाऱ्या व्यापारी व दुकानदारांवर
प्रथमच मोठी कारवाई करण्यात आली आहे. नुकतेच घोडेगाव पोलीस ठाणेचा चार्ज घेणारे
सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी पश्चिम आदिवासी भागात ही कारवाई केली
आहे. दारू पाडणारे व कच्चामाल पुरवणारी दुकानदार यांच्यावर कारवाई झाल्याने अवैद्य
धंद्यांना प्रतिबंध बसेल असा जबर पोलीस ठाण्याने गुन्हेगारांवर बसविला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात दारू धंदयावर
घोडेगाव पोलीसांनी धडक कारवाई करून दारू पाडण्याचे पाच ठिकाणी नष्ट केली आहेत. या
कारवाईत पाचशे लिटर कच्चे रसायन, दारू बनविण्यासाठी वापरात येणारा नवसागर, गुळ जप्त करून नष्ट
केला. यामध्ये त्यांनी फक्त दारू पाडणाऱ्यावर कारवाई केली नाही. तर नवसागर व गुळ
विकरणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहे.
घोडेगाव
पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दारू पाडणाऱ्यावर कडक
कारवाईचा बडगा उचलला आहे. डिंभे ते माळीणफाटा दरम्यान अडिवरे, माळीणफाटा, आंबेगाव वसाहत, कोकणेवाडी, नवलेवस्ती या पाच
ठिकाणी जीवन माने, पोलिस
हवालदार जालिंदर रहाणे, स्वप्नील
कानडे यांनी कारवाया केल्या. अडिवरे वांदरवाडी येथे दारू पाडण्यासाठी जमिन पुरलेले
आठ प्लास्टिक बॅरल बाहेर काढून नष्ट केले. त्यांच्या या कारवाईमूळे याभागातील दारू
बनविणाऱ्यांवर मोठी जरब बसणार आहे.
यामध्ये अडिवरे जवळ वांदरवाडी येथे १०० लीटर कच्चे रसायन व वीस
नवसागराच्या वडया मिळूनआल्या. याप्रकरणी दहा हजार पाचशे रूपयांचा माल बेकायदा व
वीना परवानगीचा मिळून आल्याची तक्रार देण्यात आली आहे. यातील कच्चे रसायन
जाग्यावरच नष्ट करण्यात आले. दारू पाडण्यासाठी वापरात येणारे साहित्य फोडून
टाकण्यात आले. यातील दारू पाडणारा यशवंत पवार यांच्या विरूध्द व नवसागराच्या वाडया
विकणारा संतोष जनरल स्टोअर अडिवरे या दुकानचा मालक जानकु तुकाराम शेळके यांच्या
विरूध्द घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळीण फाटयाजवळ आमडे गावच्या हद्दीत १२५ लिटर कच्चे रसायन व २०
नवसागरच्या वडया मिळून आल्या. या प्रकरणी १३ हजार रूपयांचा माल बेकायदा व विना
परवानगीचा मिळून आला. यातील कच्चे रसायनचा माल नष्ट करून दारू पाडणारा दिनेश
पांडुरंग मुकणे यांच्या विरूध्द व नवसागरच्या वडया विकणारा तांबोळी ट्रेडर्स
अडिवरे येथील फिरोज हसन तांबोळी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरघर गावच्या हद्दीत नवलेवस्ती येथे ११० लिटर कच्चे रसायन व २०
नवसागरच्या वडया व एक किलो काळा गुळ सापडल्या. याप्रकरणी आकरा हजार पाचशे पन्नास
रूपयांचा माल बेकायदा व वीना परवानगीचा मिळून आला. यातील कच्चे रसायान जाग्यावर
नष्ट करण्यात आले. तसेच दारू पाडणारा मोतीराम सावळेराम वाघ याला ताब्यात घेण्यात
आले.
त्याने नवसागर व गुळ कोकणेवाडी मधून आणत असल्याचे सांगितले. यावरून
कोकणेवाडीतील सहयाद्री सुपर मार्केटवर धाड मारली असता नवसागर व गुळ मिळून आला.
दुकानमालक ऋषीकेश दिगंबर कोकणे यांच्या विरूध्द सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला.
शाश्वत संस्थेच्या आंबेगाव वसाहत येथे रहात असलेल्या कातकरी घरकुलांमध्ये १६० लिटर कच्चे रसायन, नवसागर व गुळ मिळून असा आठरा हजार पाचशे रूपयांचा माल मिळून आला. याप्रकरणी अंकुश पांडुरंग असवले, गणपत भागुजी मुकणे व सहयाद्री सुपर मार्केट याच्यावर गुन्हा दाखल झाला.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने म्हणाले, दारू तयार करणे व विक्री करणे याच्या सोबतच ज्या दुकानातून किंवा व्यापारी यांच्याकडून त्यासाठी कच्च्या मालाचा पुरवठा केला जातो त्यांच्यावरही गुन्हे दाखल केला आहे. यानंतरही अशा प्रकारचे व्यापारी तसेच बेकायदेशीरपणे दारू विक्री करणारी सरकारमान्य दुकानदारांवर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर प्रतिबंधात्मक कारवाईद्वारे अवैद्य दारू विक्रीला पायबंद घालण्यासाठी घोडेगाव पोलीस ठाणे यापुढेही कारवाई सुरू राहणार आहेत.