शिंगवे प्रतिनिधी:
शिंगवे येथे "माझी शेती माझा सात बारा" मीच लिहणार माझा पीकपेरा" ई-पीक पाहणी मोबाईल एप चे प्रशिक्षण शेतकर्यांना बांधावर जाऊन देण्यात आले. शिंगवे ता.आंबेगाव येथील खातेदारांना ई-पीक पाहणी मोबाईल ऍपया माध्यमातुन हंगाम नुसार पीक माहिती कशा पध्दतीने भरायची यामध्ये खातेदाराचे नाव, गट नंबर,हंगामात घेतलेले पीक, सिंचन सुविधा,पड शेत्र,बांधावरची झाडे याची नोंद आता स्वतः शेतकरी आपल्या मोबाइल मधे करू शकतो. त्यामुळे पीक पेरणी विषयक माहिती अचूक भरली जाऊन विविध महसूल विषयक व कृषी विषयक योजना राबविणे ,शेतीचे झालेले नुकसान व त्यानुसार पंचनामे करणे व पीक विमा मिळवणे सोपे होणार आहे.
खातेदारांना ई पीक पाहणी अँपच्या माध्यमातून करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. अशी माहिती तहसीलदार रमा जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार शिंगवे गावच्या तलाठी सरस्वती पोंदे व कृषी सहायक यांनी दिली.यावेळी पोलीस पाटील गणेश पंडित ,ग्रामपंचायत सदस्य सोपानराव पाबळे, ज्ञानेश्वर पाबळे, सुनील वाव्हळ, संदीप गोरडे ,बाळासाहेब गोरडे ,विकास गाढवे ,शांताराम गाढवे, नंदा गोरडे जयश्री गोरडे यासह शेतकरी उपस्थित होते.