मंचर प्रतिनिधी:
चांडोली खुर्द ता.आंबेगाव येथे संडासाचे सांडपाणी उघड्यावर येऊन दुर्गंधी येऊन त्रास होतो. या बाबत फिर्यादी रोहिदास सखाराम इंदोरे (वय 56 रा. चांडोली खुर्द ता आंबेगाव जिल्हा पुणे) यांनी शेजारी राहणारे महादेव बबन इंदोरे यांना सांडपाण्याचा आम्हाला त्रास होतो असे सांगितले असता त्याचा राग मनात धरून त्यांचा मुलगा राहुल महादेव इंदोरे (रा. चांडोली खुर्द ता आंबेगाव जिल्हा पुणे) यांनी रोहिदास इंदोरे यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे. हि घटना 27 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. याबाबत रोहिदास शिंदे यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलिस नाईक आढारी करत आहे.