घोडेगाव प्रतिनिधी:
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे घरासमोरून यामाहा कंपनीची मोटार
सायकल व रोख रक्कम अशी ७० हजार रूपयांची चोरी केल्याप्रकरणी घोडेगाव पोलीसांनी
सिकंदर शेख यास अटक केली आहे.
घोडेगाव येथे योगेश भालेराव यांच्या राहते घर
उघडे होते. त्यावेळी सिकंदर जलील शेख (रा. घोडेगाव, मोमीन
गल्ली, बिस्लिललाह बिल्डंींग) हा घरात आला व
घरात असलेल्या शिलाई मशीनवर ठेवलेली मोटार सायकलची चावी व पैश्याचे पाकीट चोरी
करून अंगणामध्ये यामाहा कंपनीची मोटार सायकल घेऊन गेला. त्यावेळी त्याचे विरूध्द
घोडेगाव पोलीस ठाण्यात भालेराव यांनी तक्रार दाखल केली.
यामध्ये त्यांनी मोटार सायकल ५५ हजार रूपयांची व पाकीटामध्ये असलेली रोख रक्कम १५ हजार रूपये असे एकंदरीत ७० हजार रूपयांचा ऐवज चोरी करून नेल्याची फिर्याद दिली. त्यावेळी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार नवनाथ वायाळ यांनी सिकंदर शेख यास अटक करून नाशिक येथे जाऊन मोटारसायकल आणली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नवनाथ वायाळ, आतिश काळे करत आहे.