जुन्नर प्रतिनिधी:
जुन्नर तालुक्यातील केवाडी येथे लग्नाची वरात
धुमधडाक्यात केल्या प्रकरणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व शिवसेनेचे विद्यमान सदस्य
देवराम लांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची
हकिकत अशी की, शनिवारी रात्री देवराम लांडे यांनी
केवाडी गावात आपल्या दोन्ही मुलाची लग्न वरात काढली होती. याकरिता जिल्हाधिकारी
यांचा जमावबंदी आदेश लागू असताना व त्यांना डी.जे. न लावणे बाबत नोटिस देवून
सुद्धा केवाडी गावात सुमारे ७०० लोक जमा करुन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन डी.
जे. सिस्टीम विना परवाना चालू ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन
केल्या प्रकरणी भादवि १८८, २६९,
२७९
तसेच पोलिस अधिनियम ३७(१)(३),१३५,
१३१, ३३ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
त्याचबरोबर
बरोबर देवराम लांडे यांच्या मुलाच्या लग्नातही १८०० ते २००० लोकांची उपस्थिती
होती.हा शाही विवाह जुन्नर मध्ये आयोजित केला होता. याप्रकरणी लांडे यांच्या
नवरदेवासह कार्यालय मालक यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तरी
देखील त्यांनी पुन्हा वरात मात्र धुमधडाक्यात साजरी केली आहे.
याबाबत
पोलिस अंमलदार गणेश जोरी यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विकास
जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पाटील करत आहेत.