Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

आंबेगाव तालुक्यात आज कोरोनाचे 34 रुग्ण. कोरोना अहवाल - 31 ऑगस्ट 2021

आंबेगाव तालुक्यात आज कोरोनाचे 34 नवीन रुग्ण. कोरोना अहवाल - 31 ऑगस्ट 2021 घोडेगाव.                                 07 अवसरी  खु.                            03                 पिंपळगाव. ख                          02 मंचर.                                      03 वळती.                                   02 गावडेवाडी.                             01 पिंपळगाव घोडे.                      01 थोरांदळे.      ...

ढगफुटीमुळे, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा

नांदेड प्रतिनिधी: लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथे सोमवारी ढगफुटी झाली आहे. त्यामुळे अचानक नदी - नाले तुडुंब भरून वाहिले. मुसळदार पावसानंतर शेतात गेलेले दगडगावे कुटुंब बैलगाडीत बसून गावाकडे रिसनगावकडे निघाले. रस्त्यात हुलायवाडीची नदी ओलांडून घराकडे येत असतानाच जोरदार पुराची लाट आली. त्यात बैलगाडी उलटून त्यात गाडीतील पाचजण नदी प्रवाहात वाहून गेले. या भीषण घटनेमध्ये दोन सख्ख्या जावा बुडून मरण पावल्या आहेत. तर तिघाजणांनी नदीपात्रातील झाडेझुडपांना घरून स्वतःचा जीव वाचविला. या घटनेमुळे सावरगावावर शोककळा पसरली. नगर जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठावाडा विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातही काल रात्रीपासून संततधार सुरू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून पाथर्डी तालुक्यात १९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. पाथर्डी तालुक्यात घरे पडली , पिकांचेही नुकसान झाले आहे. पुढील काही तास पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवान विभागाने वर्तविला आहे. ...

शिंगवे येथे ई-पीक पाहणी मोबाईल अँपचे शेतकर्‍यांना बांधावर जाऊन प्रशिक्षण

शिंगवे प्रतिनिधी: शिंगवे येथे "माझी शेती माझा सात बारा" मीच लिहणार माझा पीकपेरा"   ई-पीक पाहणी मोबाईल एप चे प्रशिक्षण शेतकर्‍यांना बांधावर जाऊन देण्यात आले. शिंगवे ता.आंबेगाव येथील खातेदारांना ई-पीक पाहणी मोबाईल ऍपया माध्यमातुन हंगाम नुसार पीक माहिती कशा पध्दतीने भरायची यामध्ये खातेदाराचे नाव , गट नंबर , हंगामात घेतलेले पीक , सिंचन सुविधा , पड शेत्र , बांधावरची झाडे याची नोंद आता स्वतः शेतकरी आपल्या मोबाइल मधे करू शकतो. त्यामुळे पीक पेरणी विषयक माहिती अचूक भरली जाऊन विविध महसूल विषयक व कृषी विषयक योजना राबविणे , शेतीचे झालेले नुकसान व त्यानुसार पंचनामे करणे व पीक विमा मिळवणे सोपे होणार आहे. खातेदारांना ई पीक पाहणी अँपच्या माध्यमातून करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. अशी माहिती तहसीलदार रमा जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार शिंगवे गावच्या तलाठी सरस्वती पोंदे व कृषी सहायक यांनी दिली.यावेळी पोलीस पाटील गणेश पंडित , ग्रामपंचायत सदस्य सोपानराव पाबळे , ज्ञानेश्वर पाबळे , सुनील वाव्हळ , संदीप गोरडे , बाळासाहेब गोरडे , विकास गाढवे , शांताराम गाढवे , नंदा गोरडे जयश्री गोरडे यासह श...

तांबडेमळा येथून जाणाऱ्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचा विरोध

निरगुडसर प्रतिनिधी: आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथून जाणाऱ्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी बाधित शेतकऱ्यांनी शेतीची मोजणी करून देण्यास अधिकाऱ्यांना विरोध दर्शवला आहे. हा विरोध करण्यासाठी सर्व शेतकरी एकत्र आले होते. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी आमच्या बागायती जमिनीचे भूसंपादन न करता वनक्षेत्राच्या पडीक / माळरान जमिनीचे भूसंपादन करावे अशी शेतकऱ्यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे मागणी केली.  या रेल्वे प्रकल्पामध्ये तांबडेमळा गावातून रेल्वे प्रकल्प नेल्यास आमच्या बागायती जमिनीचे क्षेत्र जात आहे. आम्ही आमच्या जमिनी गावाच्या ओढ्यावर बंधारे , डिंभे उजवा तीर कालवा यामधून स्वखर्चाने पाईप लाईन करून पाणी आणून आमचे क्षेत्र बागायती केले आहेत. या शेती व्यवसायावरच आमच्या कुटुंबाचा उदर्निवाह होतो. आम्ही अल्प भूधारक शेतकरी आहोत , सरकारने रेल्वे प्रकल्पासाठी आमच्या शेतीवर हातोडा घालून आमच्यावर अन्याय करू नये. विकासासाठी रेल्वे प्रकल्प महत्वाचा आहे परंतु त्यासाठी आमच्या जमिनीचे भूसंपादन न करता गावाच्या शेजारी असलेल्या वन विभागाच्या पडीक क्षेत्रातून भूसंपादन करावे अशी माग...

मोटार सायकल व रोख रक्कम चोरणाऱ्यास अटक

घोडेगाव प्रतिनिधी: घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे घरासमोरून यामाहा कंपनीची मोटार सायकल व रोख रक्कम अशी ७० हजार रूपयांची चोरी केल्याप्रकरणी घोडेगाव पोलीसांनी सिकंदर शेख यास अटक केली आहे. घोडेगाव येथे योगेश भालेराव यांच्या राहते घर उघडे होते. त्यावेळी सिकंदर जलील शेख (रा. घोडेगाव , मोमीन गल्ली , बिस्लिललाह बिल्डंींग) हा घरात आला व घरात असलेल्या शिलाई मशीनवर ठेवलेली मोटार सायकलची चावी व पैश्याचे पाकीट चोरी करून अंगणामध्ये यामाहा कंपनीची मोटार सायकल घेऊन गेला. त्यावेळी त्याचे विरूध्द घोडेगाव पोलीस ठाण्यात भालेराव यांनी तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांनी मोटार सायकल ५५ हजार रूपयांची व पाकीटामध्ये असलेली रोख रक्कम १५ हजार रूपये असे एकंदरीत ७० हजार रूपयांचा ऐवज चोरी करून नेल्याची फिर्याद दिली. त्यावेळी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार नवनाथ वायाळ यांनी सिकंदर शेख यास अटक करून नाशिक येथे जाऊन मोटारसायकल आणली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नवनाथ वायाळ , आतिश काळे करत आहे.

चांडोली खुर्द येथे एकास मारहाण

मंचर प्रतिनिधी: चांडोली खुर्द ता.आंबेगाव येथे  संडासाचे सांडपाणी उघड्यावर येऊन दुर्गंधी येऊन त्रास होतो. या बाबत फिर्यादी रोहिदास सखाराम इंदोरे (वय 56 रा. चांडोली खुर्द ता  आंबेगाव जिल्हा पुणे) यांनी शेजारी राहणारे महादेव बबन इंदोरे यांना सांडपाण्याचा आम्हाला त्रास होतो असे सांगितले असता त्याचा राग मनात धरून त्यांचा मुलगा राहुल महादेव इंदोरे (रा. चांडोली खुर्द ता आंबेगाव जिल्हा पुणे) यांनी रोहिदास इंदोरे यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे. हि घटना 27 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. याबाबत रोहिदास शिंदे यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलिस नाईक आढारी करत आहे.

ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

मंचर प्रतिनिधी: अवसरी खुर्द येथील ग्रामविकास अधिकारी यांना शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी विशाल विलास भोर याच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे , अशी माहिती पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांनी दिली.या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ बाबा शिदोरे यांनी तक्रार दाखल केली आहे. या बाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवसरी खुर्द ता. आंबेगाव येथील ग्रामपंचायत कार्यलयात 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास तक्रारदार शिदोरे , सरपंच जगदीश अभंग , ग्रामपंचायत सदस्य सचिन ढोणे गावातील विकासाच्या दृष्टीने चर्चा करत असताना विशाल विलास भोर (रा.अवसरी खुर्द ता आंबेगाव) याने ग्रामपंचायत मध्ये येऊन घराचा उतारा मागितला , त्यास थकीत घरपट्टी भरण्यास ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले असता विशाल भोर याने मी थकीत घरपट्टी आत्ता व यापुढे देखील भरणार नाही , तुम्हाला काय करावयाचे असेल ते करा , मी तुम्हाला काम करू देणार नाही , असे म्हणत ग्रामविकास अधिकारी शिदोरे यांना शिवीगाळ , दमदाटी करत समोर असलेल्या टेबलवर जोरजोरात हात आपटत सरकारी कामात अडथळा आणल्य...

भैरवनाथ विद्यालय शिंगवेतील पाच विद्यार्थी एन.एम.एम.एस शिष्यवृत्तीचे मानकरी

शिंगवे प्रतिनिधी: शिंगवे (ता .आंबेगाव ) येथील भैरवनाथ विद्यालय शिंगवे शाळेतील पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिट लिस्ट मध्ये आल्याने शिंगवे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सानिका अविनाश धरम , ऋतुजा अशोककुमार वाव्हळ , अजित आबाजी वाव्हळ , आकांशा सावन राठोड या सर्व विद्यार्थ्यांनचे व एन एम एम एस शिष्यवृत्ती विभाग प्रमुख नितिन पडवळ , मार्गदर्शक शिक्षक कीरण लायगुडे , सागर वाव्हळ , मंगेश धराडे , यांचे विद्यालयाचे अध्यक्ष , संचालक सरपंच , ग्रामस्थ शिंगवे यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले. आजपर्यंत विद्यालयाचे ८० विद्यार्थी मेरिटमध्ये आले असून त्यांना २५ लाखांपर्यंत शिष्यवृत्ती मिळाली आहे.   ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व पुढील शिक्षणास मदत व्हावी , यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा , नवोदय प्रवेश परीक्षा , एन.टी.एस परीक्षा   , प्रज्ञाशोध परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उज्वल यशाची परंपरा या शाळेला लाभली आहे . तसेच क्रीडा स्पर्धा , सांस्कृतिक स्पर्धा , विज्ञान प्रदर्शन , शैक्षणिक स...

घोडेगाव हद्दीतील दारू अड्ड्यांवर पोलीस निरीक्षक जीवन माने यांची मोठी कारवाई

घोडेगाव प्रतिनिधी: घोडेगाव पोलिस ठाणे हद्दीतील दारू तयार करून विक्री करणारे यांच्या बरोबरच त्यासाठी कच्चामाल पुरवणाऱ्या व्यापारी व दुकानदारांवर प्रथमच मोठी कारवाई करण्यात आली आहे. नुकतेच घोडेगाव पोलीस ठाणेचा चार्ज घेणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी पश्‍चिम आदिवासी भागात ही कारवाई केली आहे. दारू पाडणारे व कच्चामाल पुरवणारी दुकानदार यांच्यावर कारवाई झाल्याने अवैद्य धंद्यांना प्रतिबंध बसेल असा जबर पोलीस ठाण्याने गुन्हेगारांवर बसविला आहे. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात दारू धंदयावर घोडेगाव पोलीसांनी धडक कारवाई करून दारू पाडण्याचे पाच ठिकाणी नष्ट केली आहेत. या कारवाईत पाचशे लिटर कच्चे रसायन , दारू बनविण्यासाठी वापरात येणारा नवसागर , गुळ जप्त करून नष्ट केला. यामध्ये त्यांनी फक्त दारू पाडणाऱ्यावर कारवाई केली नाही. तर नवसागर व गुळ विकरणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहे. घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दारू पाडणाऱ्यावर कडक कारवाईचा बडगा उचलला आहे. डिंभे ते माळीणफाटा दरम्यान अडिवरे , माळीणफाटा , आंबेगाव वसाहत , कोकणेवाडी , नवलेवस्ती या पा...

पब्जीच्या नाद अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यावरील १० लाख उडवले

पुणे प्रतिनिधी: पब्जी गेमनं कित्येक मुलांची व घरांची वाट लावली आहे. तरी या मुलांचा पब्जीचा नाद काही सुटत नाही.अनेक पालकांनी मुलांना ऑनलाइन लेक्चर करण्यासाठी मोबाईल घेऊन दिले आहेत. मात्र मुले त्याच्यावर   तासनतास पब्जी गेम खेळत आहे. व त्यातून पालकांचे मोठे नुकसान होत आहे. जोगेश्वरीमध्ये राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुलाला पब्जी खेळण्याचं अक्षरशः व्यसन होतं. पब्जी खेळता खेळता त्यानं आई वडिलांच्या अकाऊण्टमधून तब्बल १० लाख रुपये खर्च केले पैसे संपल्यावर मुलगा घाबरला. तो घर सोडून पळून गेला. व जाता जाता त्यानं चिठ्ठी लिहिली. जोपर्यंत मी कमवत नाही , तोपर्यंत परतणार नाही. या बाबत मुलगा अल्पवयीन असल्यानं पोलिसांना अपहरणाचा संशय आला व त्यानी त्याचा शोध सुरू करत या मुलाला पोलिसांनी १२ तासांच्या आत शोधून काढत त्याचं काऊन्सिलिंग करुन त्याच्या आई वडिलांकडे सोपवलंय. हा मुलगा अभ्यासासाठी आईचा मोबाईल वापरायचा. तो पब्जी खेळू लागला. विविध टास्कच्या नादात त्याने आईच्या मोबाईलमधून अकाऊण्टमधले तब्बल १० लाख खर्च केले. त्यामुळे खात्याला मोबाईल नंबर लिंक असेल तर पालकांनो काळजी घ्या. वारंवार अकाऊण्ट डिटेल्...

रब्बी हंगाम मधील अनुदानित बियाणे घटकासाठी महाडीबिटी पोर्टलवर अर्ज भरण्याचे आवाहन

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: कृषि विभागामार्फत शेतक-यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाने महा-डीबीटी पोर्टल विकसित केले आहे. महाडीबीटी पोर्टलमार्फत शेतक-यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान , अन्नधान्य पिके अंतर्गत सन 2021 - 2022 रब्बी हंगामात प्रमाणित बियाणे वितरण , पिक प्रात्यक्षिके , सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलमार्फत मागविण्यात येत आहेत.   30 ऑगस्ट 2021 ते 10 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात येत आहे , विहीत मुदतीत नोंदणी करणा-या शेतक-यांचाच विचार केला जाईल , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी कळविले आहे.एकुण किंमतीच्या 50 टक्के मर्यादित अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणास एका शेतकऱ्याला 2 हेक्टरपर्यंतच लाभ दिला जाणार आहे. ज्वारी , हरभरा ही पिके असून प्रमाणित बियाणे वितरण 10 वर्षाच्या आतील वाण ज्वारी - 30 (प्रति किलो) , हरभरा - 25 (प्रति किलो) , तसेच 10 वर्षाच्या वरील वाण ज्वारी - 15 (प्रति किलो) , हरबरा - 12 (प्रति किलो) असे आहे.पिक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पिक ...

लग्नाच्या वरातीत डी. जे. लावून मिरवणूक काढल्याने गुन्हा दाखल

जुन्नर   प्रतिनिधी : जुन्नर तालुक्यातील केवाडी येथे लग्नाची वरात धुमधडाक्यात केल्या प्रकरणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व शिवसेनेचे विद्यमान सदस्य देवराम लांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची हकिकत अशी की , शनिवारी रात्री देवराम लांडे यांनी केवाडी गावात आपल्या दोन्ही मुलाची लग्न वरात काढली होती. याकरिता जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आदेश लागू असताना व त्यांना डी.जे. न लावणे बाबत नोटिस देवून सुद्धा केवाडी गावात सुमारे ७०० लोक जमा करुन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन डी. जे. सिस्टीम विना परवाना चालू ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी भादवि १८८ , २६९ , २७९ तसेच पोलिस अधिनियम ३७(१)(३) , १३५ , १३१ , ३३ प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर बरोबर देवराम लांडे यांच्या मुलाच्या लग्नातही १८०० ते २००० लोकांची उपस्थिती होती.हा शाही विवाह जुन्नर मध्ये आयोजित केला होता. याप्रकरणी लांडे यांच्या नवरदेवासह कार्यालय मालक यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तरी देखील त्यांनी पुन्हा वरात मात्र धुमधडाक्यात साजरी केली आहे. याबाबत पोलिस अंमलदार गणेश जोरी ...

आंबेगाव तालुक्यात आज कोरोनाचे 58 रुग्ण. कोरोना अहवाल - 30 ऑगस्ट 2021

आंबेगाव तालुक्यात आज कोरोनाचे 58 रुग्ण. घोडेगाव मध्ये सर्वाधिक 15 रुग्ण. गावनिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. घोडेगाव.                                 15 अवसरी  खु.                            04  पिंपळगाव.                              01 मंचर.                                      09 लांडेवाडी.                               03  धामणी.                                  06 वळती.                                ...

बिबट्याने केला ३ वर्षाच्या मुलावर हल्ला

राजुरी प्रतिनिधी: राजुरी येथील गव्हाळी मळयामधील   तीन वर्षाच्या बालकाला बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजुरी (ता.जुन्नर)येथील गव्हाळी मळ्यातील रहात असलेले अक्षय चासकर यांचा तिन वर्षाचा लहान मुलगा वेद अक्षय चासकर (वय ३) अंगणात खेळत असताणा बिबटयाने अचानक पणे या बालकावर हल्ला करून त्या बालकास घराजवळच असलेल्या ऊसाच्या शेतात फरफटत नेले.मुलाचा मोठा रडण्याचा आवाज आल्यानंतर घरातील लोक बाहेर आल्यानंतर स्थानिक नागरिकांणी ऊसाच्या शेतात घेराव घालून मोठा आरडाओरड केला .मोठा आवाज आल्याने बिबटयाने   त्या मुलाला शेतात सोडुन या ठिकाणाहून पळ काढला . स्थानिक नागरिक या जखमी बालकाला आळेफाटा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले होते.परूतु हल्ला मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने या बालकाला पुणे या ठिकाणी पुढील   उपचारासाठी हलवले आहे.   दरम्यान आळेफाटा परीसरात दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणावर होत असुन वनविभाग  याकडे पुर्णपने दुर्लक्ष करत आहे. या परीसरातील ग्रामस्थांनी राजुरी परीसरा...

महावितरणकडून शेतकऱ्यांना दिलासा

मंचर प्रतिनिधी:   पुणे जिल्ह्यातील १ लाख ८ हजार १३० शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग घेतला असून शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेत सूट , महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी एकूण २८४ कोटी ३७ लाख रुपये माफ झाले आहेत. यामध्ये २८ हजार ५८७ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले असल्याची माहिती महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली. कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी जुन्या थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. शिल्लक थकबाकीपैकी ५० टक्के थकबाकी येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येत आहे. सद्यस्थितीत महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय खालावली आहे. त्यामुळे थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नाही व चालू वीजबिलांचा भरणा नाही अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. कृषिपंप वीजजोडणी धोरणाची गावागावांमध्ये जागृती करून महावितरणकडून शेतकऱ्यांना वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन करण्यात येत आ...