पुणे प्रतिनिधी:
पुणे जिल्ह्यात २२ ते २३ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली.
यात दरडप्रवण क्षेत्राचा अभ्यास व कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी ठोस आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी प्रशसनाला गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिले.
अतिवष्टीमुळे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे देखील तातडीने पंचनामे करण्यात यावे, त्याचबरोबर खरडून गेलेल्या जमिनी, पूर्ववत करण्यासाठी पकडई योजनेच्या माध्यमातून कामे हाती घेण्यात यावी. त्याचबरोबरीने परिसरात मनरेगा योजनेची कामे सुरू करावीत अश्या सूचना देखील यावेळी गृहमंत्री वळसे पाटील यांनी केल्या.
या आढावा बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाअधिकारी राजेश देशमुख, मुख्यकार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद, कृषी अधीक्षक, पुणे आयुक्त व पिंपरी चिंचवड मनपा अधिकारी उपस्थित होते.