समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूर येथील कडबी चौक ते पहलवान शाह दर्गा दरम्यान नवीन रेल्वे उड्डाण पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींचे जाहीर कौतुक केले. यासोबतच त्यांनी नितीन गडकरींकडे मदतीची मागणी सुद्धा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, आजच्या या कार्यक्रमाचे... नितीन गडकरी तुमचं काय वर्णन करु.. प्रमुख पाहुणे... नितीनजींची एक वेगळी ओळख आहे. नितीनजी मी उगाचच तुमचं कौतुक करत नाही. मला आठवतयं महाराष्ट्रात जेव्हा युतीचं सरकार आलं तेव्हा मुंबई आणि पुणे ही दोन महत्वाची शहरे महामार्गाने जोडली. या शहरांत जाण्यासाठी पाच-पाच सहा-सहा तास लागायचे जे आता दोन तासांत होत आहे. तुमच्याजागी दुसरं कुणी असतं तर म्हटलं असतं पाहतो मी कसं करता येईल पण तुम्ही ते करुन दाखवलं. आता तिच तुमची ओळख देशभरात निर्माण करत आहात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं, मुंबई आणि नागपूर हे आपली राजधानी, उपराजधानी आणखी जवळ आणत आहोत. त्यादृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. नितीनजी मला आणखी एका कामासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. कोरोनाचं संकट सुटू असताना नैसर्गिक आपत्ती येण्यास सुरूवात झाली आहे. तौत्के चक्रीवादळातून सावरत असताना आता महापूर आला. या संकटातून आपण सावरू नक्कीच. पण हे करत असताना विकास कामे जी आपण करत आहोत साहजीकच यामध्ये नवीन रेल्वेमार्ग, रस्ते, बांधकामे, नवीन उड्डाणपूल यांची मांडणी करताना जोडणी करताना पर्यावरणाचा विचार करुन करत आहोत हे सुद्धा खरं आहे.
मात्र, आता आपल्या राज्यात
रस्त्यांच्या बाबतीत तुम्ही मागे बोलले होते आणि तुम्ही ते केलं की रस्ते असे
तयारव व्हायला हवेत की खड्डे पडले नाही पाहिजेत. महापुरात रस्त्येच्या रस्ते खचत
आहेत. पुन्हा पुढील वर्षी संकट येऊ शकतात. येऊ नये अशी प्रार्थना आहे. काही ठिकाणी
घाट खचले आहेत, पूर वाहून गेले आहेत. अशा परिस्थितीत तुमची मदत पाहिजे. सर्व
तंत्रज्ञानाची महाराष्ट्राला गरज आहे. जे काम केलं आहे त्याची मजबुतीकरण कसं करता
येईल हे सुद्धा पाहायला हवं.