मंचर
प्रतिनिधी:
मंचर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात महाराष्ट्रातील चौथ्या आणि पुणे जिल्ह्यातील पहिल्याच बालस्नेही पोलीस स्टेशनचा उदघाटन सोहळा आज ३१ जुलै रोजी उत्साहात संपन्न झाला. जुवेनाईल जस्टीस कायद्याच्या कलम ३७ प्रमाणे सदर बालस्नेही केंद्र तथा स्टेशनची स्थापना करटण्यात अली आहे. या उपक्रमाचे उदघाटन पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या सोहळ्याच्या तसेच मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या सेवपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना निवृत्तीनंतरचे आयुष्य आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा दिल्या.
आंबेगाव
तालुक्यातील नागापूरच्या माजी महिला सरपंच वैशाली पोहकर आणि इतर सहकारी महिलांच्या
मागणीपश्चात; पोलीस
निरीक्षक सुधाकर कोरे आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या
प्रयत्नातून मंचर येथे राज्यातील चौथे आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील पहिलेच
असणारे बालस्नेही पोलीस स्टेशन येणाऱ्या काळात एक आदर्श ठरेल असे मत पोलीस अधीक्षक
डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केले. या उपक्रमासाठी कलाशिक्षक संतोष चव्हाण,
संदीप क्षीरसागर, दीपक चवरे, उद्योजक अजय घुले यांनी सहकार्य
केले.
सुधाकर कोरे यांना मंचर पोलीस स्टेशनमध्ये खूप कमी काळ मिळूनही त्यांनी धडाकेबाज काम करून दाखवले. अगदी निवृत्तीच्या दिवशी देखील बालस्नेही सारखा उपक्रम सुरू करून कोरे यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. असे कर्तव्यदक्ष अधिकारी निवृत्त होत असताना सहकाऱ्यांना वाईट वाटते. कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला गणवेशाची एव्हडी सवय असते, की तो त्या अधिकाऱ्याच्या शरीराचा आणि एकंदरीतच जीवनाचा एक भाग असतो. त्या अधिकाऱ्यालाही नाईलाजाने निवृत्ती स्वीकारावीच लागते. परंतु असे अधिकारी निवृत्त होत असताना, आपल्या कामातून मागे जो आदर्श ठेवून जातात तो अतिशय प्रेरणादायी असतो. पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी देखील असाच आदर्श ठेवला आहे. अशा शब्दांत डॉ. देशमुख यांनी आपले मत मांडले.
सदर
कार्यक्रमात ऍड. संध्या बाणखेले, मनीषा गावडे, मालती थोरात, प्रमिला
टेमगिरे आदि महिलांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि
सूत्रसंचालन कातोळे यांनी केले, तर उपविभागीय पोलीस अधिकारी
अनिल लांभाते यांनी आभार मानले. यावेळी खेड चे पोलीस निरीक्षक सतीश गुरव, घोडेगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, मंचर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर शेटे, उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, उपनिरीक्षक अपर्णा जाधव, उद्योजक अजय घुले, जेष्ठ
पत्रकार डी. के. वळसे, संतोष वळसे, मंचर
पोलीस स्टेशनचे कर्मचारी, दक्षता समितीचे कर्मचारी आदी
मान्यवर उपस्थित होते.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर टॅप करा.
____________________________________
सिंघम पोलीस अधिकारी सुधाकर कोरे निवृत्त होत असताना, एक चांगला सहकारी सोबत नसणार याचे दुःख वाटते. कोरे यांना त्यांचे निवृत्तीपश्चातचे आयुष्य आरोग्यदायी जावो यासाठी शुभेच्छा - डॉ. अभिनव देशमुख (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण)