नारायणगाव प्रतिनिधी:
नारायणगाव शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या कुंटनखान्यावर छापा टाकून नारायणगाव पोलिसांनी स्वतःच्याच घरात कुंटनखाणा चालवणाऱ्या संगीता संजय भोईटे (वय ४७ , राहणार कोल्हेमळा रोड, नारायणगाव) या महिलेला अटक केली, अशी माहीती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
संगीता भोईटे या येथील ग्रामीण रुग्णालया जवळ असलेल्या इमारतीत
कुंटनखाणा चालवत असल्याची माहिती मिळाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार
जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला असता या कुंटनखाण्यात तीन
महिला आढळून आल्या. या महिलांकडे चौकशी केली असता आम्ही ओळखीचे लोकांकडुन पैसे
घेवुन या ठिकाणी वेश्या व्यवसाय करतो. मिळालेल्या पैशातुन ठरावीक रक्कम रूम मालकीन
संगीता भोईटे यांना देत आहोत.
यावरून पोलिसांनी संगीता भोईटे यांचेवर गुन्हा रजि. नंबर १४२/२०२१ अनैतीक व्यापार प्रतिबंधक कायदा
१९५९ चे कलम ३, ४,५,७(१)(ब) अन्वये गुन्हा दाखल करून
त्यांना अटक केली. वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणलेल्या महिलांना मुंढवा (पुणे )
येथील महिला सुधार गृहात पाठवण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा
पोलीस निरीक्षक ताटे, दिनेश साबळे, मेचकर, धनंजय पालवे, सचिन कोबल, शैलेष वाघमारे, होमगार्ड आकाश खंडे यांचे पथकाने केली.