कोल्हापूर प्रतिनिधी:
कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व महापूराच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या समवेत कोल्हापूर शहरातील शाहूपुरी,पंचगंगा हॉस्पिटल व छत्रपती शिवाजी पूल परिसराची पाहणी केली. जिल्हा प्रशासनाकडून पुरविण्यात येत असलेल्या मदतीची माहिती दिली.
यावेळी, मा. मुख्यमंत्री महोदयांनी शाहूपुरी, कुंभारगल्ली परिसरातील पूरग्रस्त व्यापारी, व्यावसायिक, गृहिणी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतल्या. तसेच, या संकटकाळात राज्य सरकार पुरग्रस्तांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगत व्यावसायिक व नागरिकांना धीर दिला.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्राम विकास मंत्री तथा कामगार मंत्री हसन मुश्रीफ,
तसेच जिल्ह्यातील आमदार खासदार पदाधिकारी उपस्थित होते