Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

आंबेगाव तालुका कोरोना अहवाल दिनांक. 31 जुलै 2021

आज आंबेगाव तालुक्यात नव्याने  56   रुग्ण भेटले आहे.                                                        जारकरवाडी. 01 अवसरी खु. 02                  शिंगवे. 02 निरगुडसर. 01 वळती. 01 पिंपळगाव घोडे. 01 पारगाव. 09 पोंदेवाडी. 03 नागापूर. 01 लाखणगाव. 04 पिंपळगाव ख. 01 घोडेगाव. 03 अवसरी बु. 01 चांडोली खु. 01 मंचर. 04 जाधववाडी. ...

पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या हस्ते बालस्नेही पोलीस केंद्राचे उदघाटन

मंचर प्रतिनिधी: मंचर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात महाराष्ट्रातील चौथ्या आणि पुणे जिल्ह्यातील पहिल्याच बालस्नेही पोलीस स्टेशनचा उदघाटन सोहळा आज ३१ जुलै रोजी उत्साहात संपन्न झाला. जुवेनाईल जस्टीस कायद्याच्या कलम ३७ प्रमाणे सदर बालस्नेही केंद्र तथा स्टेशनची स्थापना करटण्यात अली आहे. या उपक्रमाचे उदघाटन पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या    सोहळ्याच्या तसेच मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या सेवपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना निवृत्तीनंतरचे आयुष्य आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा दिल्या. आंबेगाव तालुक्यातील नागापूरच्या माजी महिला सरपंच वैशाली पोहकर आणि इतर सहकारी महिलांच्या मागणीपश्चात ; पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून मंचर येथे राज्यातील चौथे आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील पहिलेच असणारे बालस्नेही पोलीस स्टेशन येणाऱ्या ...

दोन गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडी मिळालेल्या बांदलवर आता हवेलीतही गुन्हा दाखल

केसनंद प्रतिनिधी: हवेली तालुक्यात एका शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन परस्पर ६ कोटी ७५ लाख रुपये काढून घेत बोजा कमी करण्यासाठी पून्हा एक कोटी मागितल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल व साथीदारांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे व विकास भोंडवे यास अटक केली आहे. गुन्हा दाखल केलेल्यामध्ये संदीप भोंडवे , विकास भोंडवे , सचिन पलांडे आणि शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी आदींचा समावेश आहे. याप्रकरणी गंगाराम सावळा मासाळकर (वय ७४ , रा. वढु खुर्द , ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी : सन २०१३ मध्ये फिर्यादी गंगाराम सावळा मासाळकर यांच्या मालकीच्या मौजे वढू खुर्द , ( ता. हवेली , जि. पुणे) येथील गट क्र. १५३/१ मध्ये ३ हेक्टर ७१ आर या जमिनीचे गहाणखत आपसात संगनमताने करण्यासाठी मंगलदास बांदल , संदिप भोंडवे , विकास भोंडवे , सचिन प...

मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरींचं कौतुक करत म्हटलं, महाराष्ट्राला आपल्या मदतीची गरज

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   यांच्या हस्ते नागपूर   येथील कडबी चौक   ते पहलवान शाह दर्गा दरम्यान नवीन रेल्वे उड्डाण पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींचे   जाहीर कौतुक केले. यासोबतच त्यांनी नितीन गडकरींकडे मदतीची मागणी सुद्धा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं , आजच्या या कार्यक्रमाचे... नितीन गडकरी तुमचं काय वर्णन करु.. प्रमुख पाहुणे... नितीनजींची एक वेगळी ओळख आहे. नितीनजी मी उगाचच तुमचं कौतुक करत नाही. मला आठवतयं महाराष्ट्रात जेव्हा युतीचं सरकार आलं तेव्हा मुंबई आणि पुणे ही दोन महत्वाची शहरे महामार्गाने जोडली. या शहरांत जाण्यासाठी पाच-पाच सहा-सहा तास लागायचे जे आता दोन तासांत होत आहे. तुमच्याजागी दुसरं कुणी असतं तर म्हटलं असतं पाहतो मी कसं करता येईल पण तुम्ही ते करुन दाखवलं. आता तिच तुमची ओळख देशभरात निर्माण करत आहात. तुमच्य...

कुंटनखाणा चालवणाऱ्या महिलेला केली नारायणगाव पोलिसांनी अटक

नारायणगाव प्रतिनिधी: नारायणगाव शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या कुंटनखान्यावर छापा टाकून नारायणगाव पोलिसांनी स्वतःच्याच घरात कुंटनखाणा चालवणाऱ्या संगीता संजय भोईटे (वय ४७ , राहणार कोल्हेमळा रोड , नारायणगाव) या महिलेला अटक केली , अशी माहीती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. संगीता भोईटे या येथील ग्रामीण रुग्णालया जवळ असलेल्या इमारतीत कुंटनखाणा चालवत असल्याची माहिती मिळाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला असता या कुंटनखाण्यात तीन महिला आढळून आल्या. या महिलांकडे चौकशी केली असता आम्ही ओळखीचे लोकांकडुन पैसे घेवुन या ठिकाणी वेश्या व्यवसाय करतो. मिळालेल्या पैशातुन ठरावीक रक्कम रूम मालकीन संगीता भोईटे यांना देत आहोत. यावरून पोलिसांनी संगीता भोईटे यांचेवर गुन्हा रजि. नंबर   १४२/२०२१   अनैतीक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५९ चे कलम ३ , ४ , ५ , ७(१)(ब) अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणलेल्या महिलांना मुंढवा (पुणे ) येथील महिला सुधार गृहात पाठवण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक अभिन...

गृहमंत्र्यांनी दिले त्या महिला पोलिस उपायुक्ताच्या चौकशीचे आदेश.

पुणे प्रतिनिधी: ‘ व्हायरल झालेल्या ' त्या ' क्लिपबाबत संबंधित महिला पोलिस उपायुक्तांची चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. चौकशी अहवालानंतर राज्य सरकार त्याबाबत योग्य तो निर्णय घेईल ,'' अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. येक्षील विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी कोरोना उपाययोजनासंदर्भात आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शहरातील एका महिला पोलिस उपायुक्ताने कर्मचाऱ्याला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेलमधून बिर्याणी आणण्यासाठी पैसे कशाला द्यायचे , अशा आशायाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या संदर्भात विचारले असता गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले , ‘ मीसुद्धा ही क्लिप ऐकली असून , ही बाब निश्चितच गंभीर आहे. याबाबत चौकशी करून अहवाल द्यावा , असे आदेश पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. चौकशी अहवालानंतर राज्य सरकार त्याबाबत योग्य तो निर्णय घेईल. ’ फोन टॅपिंगचे आदेश तत्कालीन सरकारकडून ‘ पोलिस दलात बदली आणि बढतीबाबत कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारी होत्या. त्याची पडताळणी करण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसारच फोन टॅपिंग करण्यात आले ,’ अशी...

दरडप्रवण क्षेत्रात पुनर्वसन करण्यासाठी ठोस आराखडा बनविणार- गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील

पुणे प्रतिनिधी: पुणे जिल्ह्यात २२ ते २३ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. यात दरडप्रवण क्षेत्राचा अभ्यास व कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी ठोस आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी प्रशसनाला गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिले. अतिवष्टीमुळे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे देखील तातडीने पंचनामे करण्यात यावे, त्याचबरोबर खरडून गेलेल्या जमिनी, पूर्ववत करण्यासाठी पकडई योजनेच्या माध्यमातून कामे हाती घेण्यात यावी. त्याचबरोबरीने परिसरात मनरेगा योजनेची कामे सुरू करावीत अश्या सूचना देखील यावेळी गृहमंत्री वळसे पाटील यांनी केल्या. या आढावा बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाअधिकारी राजेश देशमुख, मुख्यकार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद, कृषी अधीक्षक, पुणे आयुक्त व पिंपरी चिंचवड मनपा अधिकारी उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यात आज 20 कोरोना रुग्णांची भर.

आंबेगाव तालुक्यात आज 20 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून 370 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात आजपर्यंत 302 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.  गावनिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे.              जारकरवाडी.                            02 अवसरी खु.                              07                  पेठ. पारगाव                             01 शिंगवे.                                     02 निरगुडसर.                               01 वडगाव का.                    ...

पॅकेज जाहीर करणारे नाही तर मदत करणार- मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे

कोल्हापूर प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व महापूराच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या समवेत कोल्हापूर शहरातील शाहूपुरी,पंचगंगा हॉस्पिटल व छत्रपती शिवाजी पूल परिसराची पाहणी केली. जिल्हा प्रशासनाकडून पुरविण्यात येत असलेल्या मदतीची माहिती दिली. यावेळी, मा. मुख्यमंत्री महोदयांनी शाहूपुरी, कुंभारगल्ली परिसरातील पूरग्रस्त व्यापारी, व्यावसायिक, गृहिणी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतल्या. तसेच, या संकटकाळात राज्य सरकार पुरग्रस्तांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगत व्यावसायिक व नागरिकांना धीर दिला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्राम विकास मंत्री तथा कामगार मंत्री हसन मुश्रीफ, तसेच जिल्ह्यातील आमदार खासदार पदाधिकारी उपस्थित होते

आजची तरुणाई "अंध" प्रेमाची "धुंद"

जळगाव प्रतिनिधी: प्रेमाला वय नसते... असे म्हटले जाते मात्र संस्कृतीचा अभाव आणि ज्ञानाची शिदोरी मिळत नसल्याने अल्पवयीन मुले-मुली प्रेमात पडून हट्टी बनले आहेत. त्यामुळे पालकांवरच हतबल होण्याची वेळ आल्याचा प्रकार नुकत्याच एका   घटनेने उघडकीस आला. पुण्यातील एक साडे सतरा वर्षांच्या तरुणीची अमळनेरच्या एका तरुणाशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. आणि ती त्याच्या प्रेमात पडली , प्रेम इतके उतावीळ झाले की , तरुणीने आई- वडिलांचा विचार न करता पुणे सोडले. तरुणी धुळे पोलिसांना आढळून आली. चौकशी केली असता प्रेम प्रकरण समोर आले. पोलिसांनी तिला कायद्याचे ज्ञान देऊन तू अल्पवयीन असल्याने तुझे लग्न लावू शकत नाही , असे सांगून तिच्या वडिलांना बोलावून तिला दोन दिवस बाल सुधार गृहात पाठवले. तेथे मत परिवर्तन झाले म्हणून तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. पालकांनी पुन्हा तिचा मार्ग चुकू नये म्हणून तिच्याकडून मोबाइल जप्त केला. मात्र , प्यार किया तो डरना क्या ' म्हणत त्या तरुणीने पुन्हा पळ काढून प्रियकराचे अमळनेरचे घर गाठले. पुन्हा पालक तिला घ्यायला आले. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तरुण ...

शेजाऱ्यांच्या भांडणाला कंटाळून महिलेची आत्महत्या, पाच जणांना अटक

नारायणगाव प्रतिनिधी: शेजाऱ्यांच्या भांडणाला कंटाळून महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसांनी नारायणगाव (खोडद रोड) येथील अष्टविनायक रेसिडेन्सी सोसायटीतील एकाच कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना आज सायंकाळी अटक केली आहे. अशी माहिती फौजदार गुलाब हिंगे पाटील यांनी दिली. अनिता संभाजी पडवळ (राहणार अष्टविनायक रेसिडेन्सी) या महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसांनी राहुल गंगाधर दुशिंग , रुपाली राहुल दुशिंग , प्रविण गंगाधर दुशिंग , राजश्री प्रविण दुशिंग , गंगाधर भागाजी दुशिंग (सर्व राहणार अष्टविनायक रेसिडेन्सी खोडद रोड नारायणगाव , तालुका जुन्नर) एकाच कुटुंबातील पाच जणांना अटक आहे. याबाबत फौजदार हिंगे पाटील म्हणाले आरोपी व अनिता पडवळ हे अष्टविनायक रेसिडेन्सी सोसायटीत शेजारी राहण्यास होते. आरोपी हे अनिता पडवळ यांना वेळोवेळी टोमणे मारूण मानसिक त्रास देत होते. भांडणातून आरोपींनी अनिता यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहुन अनिता यांनी पाटे खैर...

तृतीयपंथीच्या मृत्यूने परिसरात खळबळ

कोल्हापुर प्रतिनिधी: शिये , रामनगर (ता. करवीर) येथे तृतीयपंथीच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. घरातील सोन्याचे दागिने लंपास असून दराला बाहेरून कडी होती. त्यामुळे या तृतीयपंथीचा मृत्यू नैसर्गिक की अन्य कोणत्या कारणासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. सतीश हैबतराव पवार ऊर्फ देवमामा (वय ४२ , सध्या रा. रामनगर शिये , मूळगाव हुपरी , ता. हातकणंगले ) असे त्याचे नाव आहे. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता त्यांना संशयास्पद असे काहीच आढळले नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी , शिये येथील रामनगरमध्ये सतीश पवार हे गेली दहा वर्षे रहात आहेत. तृतीयपंथी असल्याने त्यांनी आपले आयुष्य देवीचा जोगता म्हणून वाहून घेतले होते. शिये येथेच त्यांनी घर खरेदी केले होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने असल्याची परिसरात चर्चा आहे. आज सकाळी अमृत पवार हे नाष्टा घेऊन घरी आले. त्यांनी सतीश पवार यांना झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना सतीश मृत अवस्थेत आढळून आले. याबाबत त्यांनी तात्काळ शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घट...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे आयोजन, १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार

पुणे प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ जाहीर केली आहे. यंदा MAHATET 2021 परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम  मुदत २५ ऑगस्ट २०२१ आहे. त्याचप्रमाणे राज्यात रिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या ४० हजार पदांसाठी TAIT परीक्षासुद्धा घेतली जाण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून शासनाकडे वारंवार केली जात आहे. इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षक होण्यासाठी सर्व शाळांमध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.    MAHATET 2021 परीक्षेशी संबंधित सर्व माहिती , ऑनलाईन अर्ज करण्याबाबतच्या सूचना महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. टीईटी परीक्षा पेपर १ व २ साठीचे वेळापत्रक , परीक्षा फीस , अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका आराखडा व संदर्भ पुस्तके यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. MAHA TET 2021 वेळापत्रक १.ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी – ३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१ २. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढणे – २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१ ३.   टीईटी पेपर १ दिनांक ...