समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
मार्चपासून कोरोणा
महामारीमुळे संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये आहे. स्वप्नातही कुणी विचार केला नाही, असे संकट जगासमोर
ओढवले. अशा काळात संपूर्ण जग घरात असताना डॉक्टर, पोलीस, आरोग्य सेविका, सफाई कर्मचारी या
चार घटकांनी दिवस-रात्र मेहनत घेतली, परंतु सर्वेक्षण, भरारी पथक, नियंत्रक अधिकारी, टोलनाक्यावरील
ड्युटी, पेट्रोल पंपावरील
ड्युटी, समुपदेशन आशा अनेक
ड्युट्या करूनही कोरोणा योद्ध्यांच्या यादीतला समाजातील पाचवा घटक, शिक्षक हा मात्र
कोरोणा योद्ध्याच्या यादीतून उपेक्षितच राहिला आहे.
मार्चपासून शाळा
बंद आहेत पण शिक्षण बंद नाही.शिक्षक काय करत आहे असा प्रश्न निश्चितच समाजातील
प्रत्येकाला पडत होता, परंतु आशा महामारीच्याच्या काळात
शिक्षक गुगल मीटिंग, झूम मीटिंग, व्हाट्सअप ग्रुप
या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवून त्याने शिक्षण प्रक्रिया कुठेच खंडित केली
नाही. कोरोना काळातही तो विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहिला.एवढेच नव्हे तर
सर्वेक्षण, भरारी पथक, नियंत्रक अधिकारी, टोलनाक्यावरील
ड्युटी, पेट्रोल पंपावरील
ड्युटी, समुपदेशन आशा अनेक
कामांच्या माध्यमातून त्यांनी देशाला राष्ट्रीय कामात मदत केली. कोरोना
योद्ध्यांच्या यादीत नाव असो अगर नसो पण त्यांने आपले काम प्रामाणिकपणे पार पाडले
आणि राष्ट्रीय कामात हातभार लावला.
कोरोना काळातील
आपली ड्युटी पार पाडत असताना अनेक शिक्षक कोरणा बाधित झाले तर काही त्यात
दगावलेही.काही अपघाताचेही शिकार झाले परंतु या जागतिक महामारीच्या संकटात शिक्षिक
कुठेही कमी पडले नाहीत किंवा मागे हटलेही नाहीत. त्यांनी या संकटाचा अत्यंत
धैर्याने मुकाबला केला.कधी आरोग्य विभागाशी निगडित नसलेल्या शिक्षकांने आरोग्य
विभागाच्या कर्मचाऱ्यांशी खांद्याला खांदा लावून काम केले.
आज या शिक्षकाला
कोरोणा योद्ध्या म्हणून पुरस्कार मिळावा,अशी अपेक्षा नाही किंवा चार घटकांच्या
यादीत आपले नाव द्यावे, अशीही अशा नाही. परंतु समाजाने या
पाचव्या घटकाचा सन्मान ठेवावा,हीच माफक अपेक्षा आहे.कारण कोरोणा
काळात यांनीही इतरांप्रमाणे राष्ट्रीय कामात खारीचा वाटा उचलला आहे.