मंचर प्रतिनिधी:
मंचर ता. आंबेगाव येथून अंजुम फरीद इनामदार (वय वर्षे 31) ही महिला दिनांक 28 रोजी घरात कोणाला काहीही न सांगता कोठेतरी निघून गेली आहे. या बाबत ती बेपत्ता झाली असल्याची फिर्याद तिचे पती फरीद जब्बाद इमानदार (रा. मंचर ता.आंबेगाव पुणे) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की सोमवार दि. 28
रोजी फिर्यादी फरीद इनामदार हे कामानिमित्त आपल्या मित्राबरोबर पिंपरी-चिंचवड येथे
गेले होते. त्यानंतर त्यांना सकाळी 8:30 वाजता त्यांचे
वडील यांनी फोनवरून तुझी पत्नी अंजुम ही घरात नसल्याचे कळवले. त्यानंतर फिर्यादी
घरी आल्यानंतर त्यांनी व त्याच्या कुटुंबीयांनी अंजुमचा मंचर व परिसरात शोध घेतला
तसेच नातेवाईक यांच्याकडे फोनवरून शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे ती
बेपत्ता झाली असल्याची माहिती फरीद इनामदार यांनी मंचर पोलिस ठाण्यात दिली आहे.
बेपत्ता महिलेचे वर्णन
नाव - अंजुम फरीद इनामदार वय 31 ,उंची
5 फूट, रंग गोरा, अंगाने मध्यम, केस काळे व लांब,
नाक
बसके, चेहरा गोल अंगात लाल रंगाचा कुर्ता व सफेद रंगाचा सलवार व ओढणी,
गळ्यात
सोन्याचे मणी मंगळसूत्र, दोन्ही हातात हिरव्या रंगाच्या
बांगड्या, असे असून वरील वर्णनाची महिला कोठे आढळून आल्यास मंचर पोलिसांची
संपर्क साधावा असे आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र हिले यांनी केले
आहे.