पुणे प्रतिनिधी:
चंदन नगर येथील १९ वर्षीय युवकाला सोशल मिडीयावर हातात कोयता घेऊन ठेवेलेले स्टेटस चांगलेच महागात पडले आहे. संभाव्य गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चंदन नगर च्या आंबेडकर नगर मधील अनिकेत साठे या १९ वर्षीय युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अनिकेत साठे हा नेहमी कोयता आणि तत्सम हत्यारे हातात घेऊन सोशल मिडीयावर आपले फोटो स्टेट्स म्हणू ठेवतो, परिसरात दहशत निर्माण करतो आणि त्याचे वर्तनही संशयास्पद आहे. अशी माहिती पुणे गुन्हे शाखा चार च्या पथकाला मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे व सहाय्यक फौजदार गणेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजस शेख, दीपक भुजबळ, पोलीस नाईक कौस्तुभ जाधव, सुरेश साबळे, स्वप्नील कांबळे आणि सुरेंद्र साबळे यांनी सापळा रचून संबंधित युवकाला ताब्यात घेतले आहे. संबंधित युवकाकडून एक लोखंडी कोयता जप्त केला असून त्याचेवर शस्त्र अधिनियम १९५९ आणि तत्सम कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत.
अलीकडे समाजमाध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे अनेक तरुण मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यातच शहरांमध्ये रायझिंग गंग्स चे मोठे पेव फुटले असून अनेक तरुण याकडे आकर्षित होऊन असे वेडे धाडस करत आहेत, त्यासाठी मुलांचे, त्यांच्या पालकांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांच्या संगोपनाकडे लक्ष द्यावे असे मत पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी केले.