समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
भारतात तयार झालेली भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस अनेक देशात वापरली जाते. ही लस परिणामकारण असल्याचंही सिद्धही झालं आहे. अशातच ब्राझील सरकारने भारत बायोटेकसोबतचा आपला करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्राझीलच्या या निर्णायामुळे भारत बायोटेकला मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे. ब्राझीलने तब्बल 20 मिलियन लसीची ऑर्डर रद्द करण्याचा हैदराबातस्थित भारत बायोटेकनं कोवॅक्सिनची निर्मिती केली आहे. ब्राझील भारत बायोटककडून २० मिलियन लसींचा साठा खरेदी करणार होता. या करारावरुन ब्राझीलमध्ये राजकीय वातावरण तापलं होतं. त्यामुळे अखेर बुधवारी ब्राझीलने हा संपूर्ण व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं हा करार रद्द करत असल्याची घोषणा ब्राझीलचे आरोग्य मंत्री मार्सेलो यांनी केली.
कोवॅक्सिनच्या करारात ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष
जायर बोल्सोनेरो यांच्यावर भ्रष्टाचार लपवत असल्याचे आरोप झाले. त्यामुळे ब्राझील
सरकारनं अखेर संपूर्ण करारच रद्द करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत या प्रकरणाची
चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत
कोवॅक्सिनसोबत करण्यात आलेले करार थंड बस्त्यातच राहणार असल्याचं वृत्त
ब्राझीलमधील माध्यमांनी दिलं आहे.
निर्णय
घेतला आहे. यामुळे भारत बायोटेकला ३२४ मिलियन डॉलरचा फटका मानला जात आहे.