खेड प्रतिनिधी:
पुणे नाशिक महामार्गावर खेड घाटाचे काम
करणाऱ्या रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीला खेडच्या
तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी अनाधिकृत उत्खननाबाबत ३ कोटी ३२ लाख रुपयांचा
दंड ठोठावला आहे. हा दंड कंपनीने वेळेत न भरल्यामुळे अनाधिकृतरित्या मुरूम दगड
साठविलेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारावर त्याची बोजा नोंद
करण्यात आली आहे. गेली दोन वर्षापासून खेड बायपास घाटाचे काम सुरू आहे. हे काम रोडवेज
सोल्युशन कंपनीने घेतले आहे. काम करताना सुरूंग लावून डोंगर फोडण्यात आला
आहे. डोंगर फोडताना या ठिकाणी मोठया प्रमाणात मुरुम, दगडाचे उत्खनन झाले.
हा
मुरुम सस्त्याच्या कामासाठी वापरणे गरजेचे होते. मात्र संबंधित ठेकेदाराने खाजगी
शेतकऱ्याच्या जागे ८ हजार ब्रास मुरुम, माती, दगड याचा साठा
केला असल्याची बाब समोर आली आहे .
गेली
दोन वर्षापासून खेड बायपास घाटाचे काम सुरू आहे. हे काम रोडवेज सोल्युशन कंपनीने
घेतले आहे . काम करताना सुरूंग लावून डोंगर फोड०यात आला आहे .डोंगर फोडताना
या ठिकाणी मोठया प्रमाणात मुरुम,
दगडाचे उत्खनन झाले . हा मुरुम सस्त्याच्या कामासाठी वापरणे गरजेचे
होते. मात्र संबंधित ठेकेदाराने खाजगी शेतकऱ्याच्या जागेत गट क्रमांक ७४/३ मध्ये ८
हजार ब्रास मुरुम, माती, दगड याचा साठा केला . त्याचा एका
शेतकऱ्याला फायदा झाला . हा साठा करताना या हिस्सातील दोन शेतकऱ्यानी मुरुम साठा
करण्यासाठी ना हरकत स्टॅम्प पेपरवर लिहून दिली होती. या भरावाबाबत हरकत घेऊन
कोर्टात वाद या जमिनी बाळासाहेब शामराव थिगळे या शेतकऱ्याने त्याबाबत
उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक १३ यांचेकडे तक्रार केली होती या अनाधिकृत
भरावाबाबत तहसिलदारांनी पंचनामा करण्यात आला. पंचनाम्यामुसार आनंदा थिगळे, शांताराम थिगळे, दशरथ थिगळे यांच्यासह कंपनीला नोटीस
काढून म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. शासनाने कंपनीला झालेल्या दंडाची रक्कम
निविदा रकमेतून कमी करून बोजा काढून टाकावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पंचनाम्यानुसार सदर गौण खनिज रस्त्याचे कामासाठी वापरणे गरजेचे होते .
मात्र कंपनीने परवानगी न घेता खाजगी खोलगट जागेत भराव करून संबधितांना फायदा
पोहचावला . या अनाधिकृत भराव व उत्खनन याबाबत कंपनी व शेतकरी दंडात्मक कारवाईस
पात्र आहेत .