समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील यांचेच नाव दिले
पाहिजे अशी मागणीनवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव द्या- गणेश
नाईकयांनी केली आहे. आगरी समाजाचा आग्रह सरकारने मानला पाहिजे, असेही
नाईक यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे मोठेच आहेत पण दी बां पाटील हे
प्रकल्पग्रस्तांचे दैवत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. पण
दी. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात गणेश नाईक दिसले
नव्हते, त्यावर
आपली तब्येत ठीक नव्हती म्हणून आंदोलनात नव्हतो, असे
स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
आघाडी
सरकारवरही गणेश नाईकांनी जोरदार टीका केली आहे. या सरकारचं काम बरोबर नाही, हे
सरकार स्वत:हूनच पडेल असेही त्यांनी म्हटले आहे. पंधरा ऑगस्टपर्यंत दि. बा यांचे
नाव दिले नाही तर आंदोलन चालूच राहणार असेही त्यांनी सांगितले आहे. समृध्दी
महामार्गाला बाळासाहेबांचे नाव, मुंबईत बाळासाहेबांचं स्मारक
होत आहे, विमानतळ
पूर्ण नाही म्हणून भाजपने आतापर्यंत नाव घेतलं नव्हतं पण उध्दव ठाकरेंना
विमानतळाला नाव देण्याची घाई का होती, सर्व लोकांशी चर्चा करून निर्णय
घ्यायला पाहिजे होता, असे गणेश नाईक यांनी म्हटले आहे.