आंबेगाव प्रतिनिधी:
आंबेगाव
तालुक्यातील अवसरी खुर्द येथे नव्याने सुरू झालेले शिवनेरी जम्बो कोविड सेंटर
कार्यरत झाले आहे. कोविड रुग्णांच्या औषधोपचारांसाठी, त्यांना ऑक्सिजन
बेड व इतर सुविधा मिळाव्यात यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध
उपाययोजना इथे कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
परिसरातील कोविड
रुग्णांसाठी अद्यावत असे हे सेंटर मोठाच दिलासा ठरला आहे. रुग्णसेवेचे व्रत
घेतलेले येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी विशेषत्वाने वयोवृद्ध रुग्णांची
आस्थापूर्वक काळजी घेताना पाहून अतीव समाधान वाटले.