जुन्नर प्रतिनिधी:
अल्पवयीन मुलीचे लग्न लावले, इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे तसेच मानसिक व शारीरिक छळ प्रकरणी
जुन्नर पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेर अली
मोहम्मद हुसेन सय्यद, अमीन जेहरा सय्यद (दोघे रा. मंचर)
फुराद दोस्त महमंद सय्यद, दोस्त मोहम्मद सय्यद, मोहम्मद नाझीर सय्यद (रा. बारव ता. जुन्नर) सय्यद शौकत अली युसुफ अली, सय्यद मोहम्मद ईसाक रोशन अली, सिबतेनबी मुनव्वर अली इनामदार, सय्यद गुलाब अस्करी हुसेन व हुसेन ट्रस्टी मंचचे अध्यक्ष व सदस्य
(रा.मंचर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी ही अल्पवयीन मुलगी आहे असे
माहीत असतानाही तिचे लग्न मोहम्मद नझीर सय्यद याचे सोबत लावले तसेच हुसेन ट्रस्ट
मंचरचे अध्यक्ष व सदस्य यांना ही फिर्यादी ही सोळा वर्षाची आहे हे माहीत असतानाही
त्यांनी फिर्यादीचे वय 18 वर्षे पूर्ण आहे असे खोटे सांगून फिर्यादीचा निकाहनामा
करून दिला. त्यानंतर फिर्यादीस तिचे सासू-सासरे व नवरा यांनी नांदणे करिता जुन्नर येथे आणले असता फिर्यादी ही अल्पवयीन
असल्याचे माहीत असतानाही तिच्या सोबत लग्न केले. फसवणूक करून मानसिक व शारीरिक
जाचहाट करून त्रास दिला अशी तक्रार आहे. जुन्नरचे पोलीस निरीक्षक विकास जाधव
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.