मंचर प्रतिनिधी:
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने
गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काही दिवसातच लोणी,
चांडोली, तळेघर
येथे पेट्रोल पंप चालू करण्याचे नियोजित आहे, तर चांडोली येथे
एक हजार मेट्रिक टनचे गोडाऊन व शेतकऱ्यांसाठी शीतगृह बांधण्यात येणार असल्याची
माहिती बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी दिली.
लोणी ता. आंबेगाव येथील उपबाजारात विविध विकास
कामाच्या भूमिपूजन प्रसंगी देवदत्त निकम बोलत होते, यावेळेस माजी
आमदार पोपटराव गावडे,कात्रज दुध संघाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे,जिल्हा
परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,प्रकाश पवार,दादाभाऊ पोखरकर,शिरूर
बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर,आर.आर. वाळुंज,गृह विभागाचे
सहसचिव कैलास गायकवाड,रामदास जाधव,अशोक आदक,
उदय
डोके बाजार समितीचे सर्व संचालक व सचिन बोऱ्हाडे, कर्मचारी
उपस्थित होते.
देवदत्त निकम म्हणाले लोणी उपबाजारात शिरूर
तालुक्यातील काही भाग तसेच नागापूर, रांजणी, वळती,निरगुडसर,
अवसरी,
पारगाव,
शिंगवे,
लोणी,धामणी,खडकवाडी,
पोंदेवाडी,
वाळुजनगर,वडगावपीर,
पहाडदरा
या परिसरातून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत असते त्यासाठी ६०×३००
फुटाचे कांदा लिलाव शेड उभारण्यात येणार आहे, मागील वर्षी या
उपबाजारात सुमारे साडेतेरा कोटीची कांदा विक्री झाली आहे. येत्या काही दिवसात 60
टन इलेक्ट्रॉनिक वजन काटा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे, या उप बाजारात
कांदा या शेतमालावर कोणताही कडता घेतला जात नाही, शेतकऱ्यांना
कांदा लिलाव आनंतर 48 तासात मालाचे पेमेंट केले जाते सर्व लिलाव हे बाजार समिती
मार्फत केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो,असे
निकम यांनी सांगितले.
विवेक वळसे पाटील म्हणाले की लोणी हे गाव
पूर्वी मोठी बाजारपेठ म्हणून समजली जात होती सध्या पूर्वीसारखी बाजारपेठ राहिली
नसून सध्या लोणी उपबाजार च्या निमित्ताने या परिसरात अनेक सोयी निर्माण होत आहेत,
त्यामुळे
या परिसराचा विकास होण्यास नक्कीच फायदा होईल आर्थिक स्तर उंचावेल असे वळसे-पाटील
म्हणाले.
पोपटराव गावडे म्हणाले बाजार समितीत काम करताना
शेतकरी व व्यापारी यांचे नुकसान होणार नाही असे निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांचा फायदा
होईल, देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर बाजार समितीने
शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण केल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा
नक्कीच फायदा होईल असे गावडे म्हणाले.
यावेळेस लोणी गावचे सरपंच उर्मिला धुमाळ
विक्रेते महेंद्र वाळुंज,प्रकाश बापू पवार,विष्णू
काका हिंगे यांनी आपले मनोगत मांडले.