मंचर प्रतिनिधी:
मंचर तालुका आंबेगाव येथील तरुणीला रेल्वे मध्ये नोकरीला लावते असे म्हणत तिच्या वडिलांकडून 4 लाख रुपये घेऊन तिची फसणुक केल्याने नूरजहाँ बाबासाहेब मुलानी, गिरीश बंडू मुसळे राहणार किवळे देहू रोड पुणे यांच्यावर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत अस की फिर्यादी नामदेव रामभाऊ शिंदे राहणार मंचर यांच्या मुलीचे शिक्षण M.E. झाले असून तिच्यासह घरचे लोक नोकरी शोधत होते. नोकरी संदर्भात त्यांनी अनेकांना सांगितलं देखील त्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये तक्रारदार यांचे मेहुणे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून फिर्यादी यांची आरोपी मुलानी यांच्याशी ओळख झाली. तिने सांगितलं की मी गरजवंताना रेल्वे, मंत्रालय, महेंद्रा, टाटा मोटर्स, मर्सडिज बेझ, अश्या असंख्य ठिकाणी नोकरीला लावले आहे. त्याचबरोबर बँकांमधून काढून देते त्याच बरोबर मोठ मोठ्या अधिकाऱ्यां पासून ते मंत्र्यांन पर्यंत ओळखी आहेत. मी तुमच्या मुलीला रेल्वे मध्ये नोकरीला लावेल असे सांगितले
तद नंतर मुलानी या फिर्यादी व त्यांची मुलगी यांच्या संपर्कात राहून त्यांचा विश्वासात घेऊन व त्यांना सांगितलं की तुमच्या मुलीला कामाला लावण्यासाठी 4 लाख रुपये खर्च येईल असे देखील सांगितले फिर्यादी यांनी त्यांच्या मेहुण्याच्या ओळखीचे असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवत फिर्यादी यांनी 17डिसेंबर 2018 ला 2 लाख त्याचबरोबर 18 डिसेंबरला 1 लाख, 29 डिसेंबरला 50 हजार त्यानंतर 8 जानेवारी 2019 ला 50हजार असे मिळून 4 लाख रुपये आर. टी. जी. एस ने नूरजहाँ मुलानी हिच्या बँक खात्यावर पाठविले.
त्यानंतर बरेच दिवस फिर्यादी शिंदे यांनी मुलानी यांना फोन करून नोकरी संदर्भात विचारपूस केली असता मुलानी ह्या उडवा- उडवी करू लागले त्यानंतर शिंदे हे मुलानी यांनी दिलेल्या पत्त्यावर गेले असता ते त्या ठिकाणी राहत नसल्याचे समजले त्यानंतर शिंदे यांना समजलं की आपली फसवणूक झालेली आहे त्या नंतर त्यांनी थेट मंचर पोलिस स्टेशन मध्ये फसवणूक केल्या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत.