जुन्नर प्रतिनिधी:
राजुरी (ता.जुन्नर) येथील मुस्लीम समाजाच्या वतीने सर्व धर्मियांसाठी सुरू असलेल्या ख्वाजा गरीब नवाज कोवीड सेंटरच्या वतीने आमदार अतुल बेनके यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यासोबत कोरोना रुग्णांना आरोग्य सेवा देणारे डॉक्टर ,आरोग्य सेवक, सहकार्य करणाऱ्या सहयोगी संस्था यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार आणि धीरज औटी यांच्यावतीने कोवीड सेंटरला भेट देण्यात आलेल्या सोलर वाटर प्रकल्पाचे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पांडुरंग पवार, माजी सभापती दीपक औटी, माजी सरपंच एम.डी घंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक
विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी इर्शाद आत्तार, अकबर पठाण बाळासाहेब औटी उपस्थित होते. याप्रसंगी सेंटरमध्ये विशेष
कामगिरी करणारे डॉ. स्वप्नील कोटकर ,डॉ. संदीप काकडे, डॉ.
गेणभाऊ शिंदे यांनाही कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुबारक तांबोळी यांनी केले.