समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
''भाजपकडे सत्ता नसल्यामुळे कासावीस झाले आहेत,
त्यांनी
कुणकुणाची जात काढली आहे ते आम्हाला माहिती आहे. राज्यपालांना सध्या वेळ नाहीय,
वेळ
मिळेल तेव्हा ते सही करतील'' असे वक्तव्य माजी खासदार तथा शेतकरी नेते
राजू शेट्टी यांनी केले आहे.
''गेल्या वर्षी एफआरपी अदा केली ती तुकड्या तुकड्याने कारखांदारांनी दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना व्याज दिले पाहिजे अन्यथा कारवाई झाली पाहिजे. तातडीने व्याज मिळावे अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची राजू शेट्टी यांनी आज भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी,''इथेनॉलमधला
हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. ऊस दर नियंत्रण समिती आहे त्यासंदर्भात
विचारविनिमय केला, त्यामध्ये शेतकऱ्यांचा विचार करावा. साखर
कारखान्यांची शेअरची किंमत आजही एक हजारच आहे. सरकारने आपलं भाग भांडवल वाढत नाही
मात्र शेतकऱ्यांना भागभांडवल वाढवायला सांगतेय. ऊस दर नियंत्रण समितीत सदस्य घेतले
आहेत ते नामधारी आहेत, त्यांना ऊस शेतीचा अभ्यास नाही. ज्यांना
कारखान्याचा संचालक व्हायचे असेल तर त्यांनी 25 लाखाचे शेअर
घेतले पाहिजे. याबाबतीत सरकारने जर निर्णय घेतला नाही तर आम्ही कोर्टात धाव घेऊ.
आधीच्या भाजप आणि आताच्या महाविकास आघाडी सरकारने ज्या लोकांना समितीत घेतले ते
मंत्र्यांच्या जवळचे आहेत.'' अशी माहिती राजू शेट्टी यांनी सांगितली