समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
मालाडमध्ये जंबो कोविड सेंटरचे लोकार्पण सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, "आरोग्य यंत्रणांवर ताण असूनही राज्याने कोरोनाची दुसरी लाट थोपवली. आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने रस्त्यांवर पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. तिसरी लाट कधी येईल माहिती नाही. पण गर्दी वाढत गेली तर दुसरीच लाट पुन्हा आपल्यावर उलटेल...". मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्याला भाजपच्या अतुल भातखळकरांनी सडेतोड उत्तर दिले.
राज्यात दोन आठवडे लॉकडाउनचे निर्बंध शिथील
करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतच राज्य सरकारने पुन्हा हे निर्बंध लागू
केले. त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या रोजीरोटीवर होत असल्याचे वास्तव समोर
दिसत असूनही या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यास राज्य सरकारवर तयार नाही. तशातच
सोमवारी मालाडमध्ये मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणात कोविडच्या दुसऱ्या
लाटेची भीती उपस्थितांना दाखवली. याच मुद्द्यावरून भाजपचे अतुल भातखळकर यांनी
त्यांच्यावर टीका केली. "तिसऱ्या लाटेचं सोडा, पण गर्दी कराल
तर दुसरीच लाट पुन्हा उलटेल असे उपदेशाचे डोस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले
आहे. आता मुख्यमंत्री ज्या पद्धतीने गर्दी करत आहेत; तशीच गर्दी करत राहिले तर आता
असलेली दुसरी लाट जाणारच नाही आणि मग तिसरी लाट येण्याचा प्रश्नच राहत नाही.
कदाचित तिसरी लाट येऊ नये म्हणून मुख्यमंत्री दुसरी लाट जाऊ देणार नसतील हा त्यांचा
तिसर्या लाटेला थोपाविण्यासाठीचा करेक्ट कार्यक्रम आहे का? असा खोचक सवाल त्यांनी
मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.