आळंदी प्रतिनिधी:
संत तुकाराम महाराज
आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आषाढी वारीच्या
पार्श्वभूमीवर देहूगाव आणि आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी 28 जून ते 04 जुलै पर्यंत संचारबंदी करण्यात आलीय...! पिंपरी चिंचवड
पोलिस आयुक्तालयाने तसे आदेश काढले आहेत...! 28 जून ते 4 जुलै कालावधी मध्ये देहू,आळंदी मधील सर्व
प्रकारची सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक बंद राहणार आहे...
देहू, आळंदी परिसरातील
स्थानिक नागरिकाचे ओळखपत्र दाखवून प्रवेश खुला राहणार आहे...